आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन ठिकाणी महिलांमध्ये चुरशीची लढत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. शिवसेनेसह सर्वच पक्षांनी कंबर कसली असली तरी मुख्यत: भारतीय जनता पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक अस्तित्व टिकवण्यासाठीची ठरणार आहे. बाळापूर, अकोट, मुर्तिजापूर, पातूर तेल्हारा नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात ‘तेच-ते चेहरे’ घराणेशाही उतरल्याचे दिसून येत आहेत. ‘आम्ही म्हणजे पक्ष’ असे म्हणाऱ्यांना यंदाच्या निवडणुकीत काही अंशी नोटबंदीचा फटका बसणार आहे. जिल्ह्यात भारिप -बमसंचा एक आमदार सोडला तर जिल्ह्यात भाजपाचे आमदार खासदार आहेत. मात्र येथील स्थानिक पातळीवरच्या राजकारणात नेहमीच विरुद्ध चित्र दिसून आले आहे. अकोट नगरपालिकेत प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचाच वरचष्मा राहीला आहे. तर भाजप बॅकफुटवर राहीला आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते.
त्यापाठोपाठ सहकार क्षेत्र म्हणून ओळखला जाणारा राष्ट्रवादीचा जिल्ह्यात दोन नंबरवर बोलबाला राहिला आहे. या पक्षाचे काँग्रेस खालोखाल १६ नगरसेवक गेल्या निवडणुकीत निवडून आले होते. तर भाजप हा तिसऱ्या स्थानी तर ११ जागांसह भारिप बमंस हा भाजपच्या मागे तीन जागांनी होता. त्यामुळे यंदा तिसऱ्या क्रमांकावरून एक नंबरवर येण्यासाठी भाजपला मोठा संघर्ष करून सत्तेची प्रतिष्ठा दाखवण्यासाठी निकराची झुंज द्यावी लागणार आहे. तर राज्यासह देशात सत्ता नसताना नगरपालिकांच्या माध्यमातून आपले गत निवडणुकीतील संख्याबळ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससमोर टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. नगरपालिका निवडणुकीत तिसऱ्या स्थानी असलेल्या भारिप बहुजन महासंघाने अकोट, मुर्तिजापूर तेल्हारा नगरपालिकांमध्ये आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी रणनिती आखली आहे. गेल्या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर असलेली शिवसेना मात्र भाजपच्या खालोखाल राहण्यासाठी सदैव प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. देशात, राज्यात महापालिकेत आपल्या सत्तेचा कसा फायदा भाजप घेते, हे आगामी निवडणुकीच्या निकालावरून दिसेल,
जिल्हयातनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तीन ठिकाणी महिलांमध्येच लढत हाेत असून, बाळापूर येथे एक महिला उमेदवार रिंगणात अाहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक उमेदवार विधानसभेसाठी फिल्डींग लावणार अाहेत. या निवडणुकीत विजयासाठी संबंधित पक्षाच्या विद्यमान अामदारांची एकीकडे कसाेटी लागणार असून, दुसरीकडे भविष्यात हाेणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी नवीन दावेदार तर तयार हाेणार नाही ना, या विचाराने त्यांनी धसका घेतला अाहे.

जवळपास दीड दशकानंतर नगराध्यक्षाची निवड थेट जनतेमधून हाेत अाहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी संबंधित उमेदवाराला केवळ एकाच प्रभागावर लक्ष केंद्रित करुन भागणार असून, संपूर्ण पालिका क्षेत्रात फिरावे लागणार अाहे. प्रचार तंत्र, संपर्क यंत्रणाही तयार करावी लागत अाहे. यानिमित्ताने संबंधित उमेदवाराची विधानसभा निवडणुकीसाठीची रंगीत तालीमच हाेत अाहे. त्यामुळे भविष्यात हाेणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये दावेदार वाढणार अाहेत.

बाळापूर: एकच महिला रिंगणात
बाळापूरयेथे परिवर्तन पॅनल काॅंग्रेसमध्ये लढत हाेईल, असा दावा राजकीय जाणकारांमधून हाेत अाहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी अामदार पुत्र एैनाेउद्दीन खतीब, विद्यमान नगराध्यक्ष माे. जमील शेख अाणि भािरप-बमंसचे माे. फजूल रहेमान, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अािदल रशिद शेख बिलाल, अपक्ष उत्तमराव दाभाडे, सुभेदार रमेश हाताेले भाजपच्या कमलादेवी शर्मा या हे रिंमगणात अाहेत. मात्र तीन पुरुष सदस्यांमध्येच खरी लढत हाेणार अाहे. बाळापूरमध्ये ८० टक्के मुिस्लम मतदार अाहेत. भाजपने रिपाईला साेबत घेतले अाहे. भारिप-बमसंने एमअायएमशी घराेबा करीत १७ जागांवर उमेदवार उभे केले अाहेत. सत्ताधारी परिवर्तन काॅंग्रेसने सर्व २३ जगांवर उमेदवार उभे केले अाहे. भाजप -शिवसेनेच्या बिघाडीचा फायदा युती सत्ताधारी परिवर्तन पॅनला हाेऊ शकताे, असा दावा जाणकारांमधून हाेत अाहे.

अकाेट: एकही महिला नाही रिंगणात
अकाेटयेथे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महिला उमेदवार रिंगणात नाही. मात्र या नगरपालिकेकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. ‘एमआयएम’ने या निवडणुकीत प्रथमच उडी घेतली असून, थेट उमेदवारही दिला आहे. त्यामुळे एमआयएमचा करिष्मा निवडणुकीत चालणार काय, हे येणाऱ्या काळात स्पष्ट हाेईलच. इतर राजकीय पक्षांनीही आपापल्या परिने निवडणुकीच्या दृिष्टने फील्डींग लावली आहे.

मूर्तिजापूर: तीन महिलांत खरी लढत
मूर्तिजापूर येथे नगरध्यक्षपदासाठी सहा महिला रिंगणात असल्यातरी मुख्य लढत ही तीन महिला उमेदवारांमध्येच हाेईल, असा दावा राजकीय जाणकारांमधून हाेत अाहे.
नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या माेनाली गावंडे, शिवसेनेचे संगिता गुल्हाने, काँग्रेसच्या अास्था जेठवाणी, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नफरीन तब्बसुम, भािरप-बमसंच्या पूनम महाजन अपक्ष उमेदवार सविता वाघ या रिगणात अाहेत. गत विधानसभा निवडणुकीत भाजपला शहरात ८५ हजारांच्या जवळपास मते मिळाली हाेती. तर शिवसेनाला जवळपास हजार ३००. त्यामुळे शिवसेनेला तुलनेने जास्त परिश्रम करावे लागत अाहेत. भाजप हा सर्वच समाजघटकांना चालणारा असून, त्या तुलनेने शिवसेनेला मर्यादा अाहेत. सत्ताधारी राष्ट्रवादीला तर प्रचंड गळती लागली असून, अनेक पदाधिकारी राजकीय पक्षांच्या तंबूत दाखल झालेत.

तेल्हारा: सात महिला रिंगणात
तेल्हारायेथे नगराध्यक्षपदासाठी एकूण सात महिला उमेदवार रिंगणात असून, यामध्ये भाजपच्या जयश्री पुंडकर, शिवसेनेकडून विद्यमान नगराध्यक्षा कान्हाेपात्रा रामा फाटकर, अपक्ष रेखा खाराेडे, तेल्हारा शहर विकास अाघाडी प्रहार संघटनेकडून सुशीला राठी, भारिप-बमंसकडून निधी अग्रवाल, अपक्ष अर्चना राठी अािण काँग्रेसकडून वहिदा खान यांचा समावेश अाहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप- शिवसेनेत झालेल्या बिघाडीचा फटका भाजपलाच बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपच्या पक्षातून निलंबित झालेल्या विद्यमान नगराध्यक्ष कान्हाेपात्रा रामा फाटकर यांनी भाजपला ‘जय महाराष्ट्र’ करीत िशवसेनेत प्रवेश केला. याचा फटका बसू नये, यासाठी भाजपने शेतकरी पॅनलशी अाघाडी केल्याचा दावा राजकीय जाणकारांकडून हाेत अाहे. या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अािण काँग्रेस एकत्र लढत अाहेत. भारिप-बमंस नगर सेवा समितीने अाघाडी केली अाहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत खरी लढत ही भारतीय जनता पक्ष अािण तेल्हारा नगरविकास अाघाडीत हाेण्याची शक्यता वर्तविली जात अाहे.

पातूर : अाठ महिला रिंगणात, ितहेरी लढतीची शक्यता
पातूरयेथे नगरराध्यक्षपदासाठी अाठ महिला निवडणूक रिंगणात अाहेत. यामध्ये भाजपच्या रेखा गाेतरकर, शिवसेनेच्या कल्पना धनाेकार, काँग्रेसच्या प्रभा काेथळकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभा काेथळकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगला वानखडे, अपक्ष (भारिप-बमंस) शिला खंडारे, धनाबाई पुरुषाेत्तम, सुजाता बाेरकर ज्याेती सुरवाडे यांचा समावेश अाहे. अाठ महिला रिंगणात असल्या तरी मुख्य लढत ही तीन उमेदवारांमध्ये हाेणार असल्याचे मत राजकीय जाणकारांमधून व्यक्त करण्यात येत अाहे. सध्या तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप अशी तिरंगी लढत हाेईल, असे चित्र अाहे. यामध्ये लढतीमध्ये नंतर शिवसेनाही सहभागी हाेण्याची शक्यता असून, त्यानंतर मात्र लढत चाैरंगी हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...