आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदार महोदयांनी घेतली पक्षातील पाठीराख्यांची झाडाझडती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - आपलाच माणूस नगरसेवक असावा, अशी इच्छा असणाऱ्या पाठीराख्यांनी कार्यकर्त्यांना आमदार महोदयांनी तिकीटे दिलीत पण त्यांना निवडून आणण्यासाठी ते काम करत नसल्याचे काही ठिकाणी दिसल्याने आमदारांनी अशा पाठीराख्यांची झाडाझडती घेतली. तुम्ही शिफारस केलेल्या उमेदवाराला निवडून आणा त्यासाठी काय मदत पाहिजे ते घ्या पण निष्क्रिय राहण्याची गय केली जाणार नाही, असे आमदारांनी पक्षातील नेत्यांना सुनावले.

कार्यकर्त्याला तिकिट मिळवून दिल्यानंतर स्थानिक पातळीवरील नेत्यांनी हातावर हात देऊन बघ्याची भूमिका घेत असल्याचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना कळताच त्यांनी स्थानिक नेत्यांची चांगलीच झाडाझडती घेतल्याचे समजते. न. पा. २०११ च्या निवडणुकीत भाजपच्या खात्यावर फक्त सिट निवडून आल्या होत्या. या वेळी केंद्रात राज्यात भाजपचे सरकार आहे.
खासदार, पालकमंत्री स्थानिक स्तरावरील आमदारसुद्धा भाजपचे असल्याने या वेळी भाजपचा करिष्मा जादुई आकडा न. पा. निवडणुकीत कोठपर्यंत मजल गाठणार आहे, याकडे सर्वांची उत्सकुता लागून राहणार आहे. आमदार प्रकाश भारसाकळे यांनी बऱ्याच ठिकाणावर कॉर्नर सभा घेऊन भाजपचा मेनीफेस्टो मतदारांच्या समोर ठेवून मत मागत आहे. या वेळी मतदार आमदारांच्या हाकेला कितपत साथ देणार येणारी निवडणूक सर्व काही सांगून जाणार आहे.

अामदारांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक
वरिष्ठ नेत्यांनी पदधिकारी कार्यकर्त्यांची वेगवेगळी टीम तयार करून त्यांना वेगवेगळ्या प्रभागांमध्ये काम वाटून देण्यात आले आहे. त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल आमदारांकडे सादर करावा लागणार आहे. त्यामुळे येणारी निवडणूक स्थानिक नेत्यांसह आमदारांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

स्टार प्रचारकांची हजेरी लागणार का ?
अद्याप भाजपच्या स्टार प्रचारकांनी हजेरी लावली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेची चर्चा जोरात सुरू होती. त्यामुळे भाजपच्या गोटात नवचैतन्याचे वातवरण होते. निवडणुकीचा अवधी ते दिवसांवर राहिल्याने भाजपचे स्टार प्रचारक येणार की, नाही हे गुलदस्त्यात आहे.
बातम्या आणखी आहेत...