आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉँग्रेसची निवडणुकीपूर्वीच सुरू झाली वाताहत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत ७३ पैकी १८ जागा जिंकून भाजप समोर आव्हान उभे करणाऱ्या कॉँग्रेसची पाच वर्षात दयनीय अवस्थेकडे वाटचाल सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पक्षात जेमतेम उरलेल्या तगड्या उमेदवारांसोबत कोणते उमेदवार द्यावे? असा प्रश्न पक्षा समोर उभा ठाकला आहे. एवढेच नव्हे तर मुस्लिम बहुल भागातही तगडे उमेदवार मिळवण्यासाठी पक्षाला भागम भाग करावी लागतेय. या सर्व प्रकारामुळे कॉँग्रेसची निवडणुकी पूर्वीच वाताहत झाली आहे, अशी चर्चा सुरु आहे. 
 
एकेकाळी अकोला शहर आणि जिल्हा कॉग्रेसचा बालेकिल्ला होता. शहरातही कॉग्रेसची ताकद चांगली होती. महापालिकेच्या आता पर्यंत झालेल्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने ताकद कमी झालेली नाही. २००२ च्या निवडणुकीत कॉग्रेस चाच एक भाग असलेला नगर विकास आघाडीने उमेदवार उभे केल्या नंतरही कॉग्रेसचे नऊ नगरसेवक निवडुन आले. तर २००७ च्या निवडणुकीत कॉग्रेसने सत्ताही प्राप्त केली. २०१२ च्या निवडणुकीतही कॉग्रेसने १८ जागा जिंकल्या होत्या. परंतु २००२ पासूनच्या निवडणुकीतील कॉग्रेसच्या विजयाचे चित्र लक्षात घेता, हिंदु बहुल भागात कॉग्रेसची घसरण सुरु होती. तर मुस्लिम बहुल भागात कॉग्रेसचे वर्चस्व कायम होते. परंतु हिंदु बहुल भागातील सुरु असलेल्या घसरणी कडे कॉग्रेस नेत्यांनी लक्ष दिले नाही. एवढेच नव्हे तर पक्ष एकसंध ठेवण्याची किमयाही साधता आली नाही.
 
कॉग्रेस मधुन विजय देशमुख राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये दाखल झाल्या नंतर त्यांचे समर्थक नगरसेवक राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश घेतील, ही बाब २०१४ मध्येच स्पष्ट झाली होती. एवढेच नव्हे तर कोणते नगरसेवक राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये जाऊ शकतात? याची माहितीही होती. परंतु तरीही कॉग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने या नगरसेवकांना रोखण्याचा त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला नाही. एवढेच नव्हे जे नगरसेवक राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश घेणार त्यांची नावे वृत्त पत्रात प्रसिद्ध झाल्या नंतरही स्थानिक नेतृत्वाने प्रतिक्रिया देण्यासही टाळाटाळ केली. या सर्वांचा परिणाम कॉग्रेसची झोळी रिकामी होण्यात झाला. 

राष्ट्रवादी कॉग्रेसने स्वबळावर निवडणुक लढविण्याची घोषणा केल्या नंतरही कॉग्रेस कडून प्रत्युत्तर मिळालेले नाही. या सर्व प्रकारामुळेच कॉग्रेसची अवस्था दयनीय होत चालली आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीत ८० इच्छुकांना उमेदवारी देणे ही बाब कठीण नाही. या ८० मध्ये तगडे किती? असा प्रश्न आहे. 

अातापर्यंत १००-१२५ अर्जाची विक्री 
^१००१२५अर्जाची विक्री झाली आहे. पाच जानेवारी पर्यंत अर्ज विक्री सुरु राहणार आहे. तो पर्यंत २०० अर्जाची विक्री होईल. कॉग्रेसकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बबनरावचौधरी, कॉग्रेस महानगराध्यक्ष 

 
 
बातम्या आणखी आहेत...