आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक लढवण्याचा निर्णय : एमअायएमने केली 13 प्रभागांची चाचपणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - एमअायएम (अाॅल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीन ) महापािलका निवडणूक लढणार असल्याची घाेषणा पक्षाने महानगराध्यक्ष जमील खान रसूल खान अािण सचिव माे. मुस्तफा यांनी बुधवारी पत्रकार परिषेदत केली. १३ प्रभागांची चाचपणी करण्यात येत असून, १० प्रभागात उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचे एमअायएमच्या नेत्यांनी सांगितले. 
महापािलका निवडणुकीत प्रचारासाठी एमअायएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असाेउद्दिन अाेवेसी, अामदार अकबराेउद्दिन अाेवेसी, अामदार इम्तियाज जलील, अामदार वारीस पठाण येणार अाहेत. शहरात एमअायएमकडून निवडणूक लढण्यासाठी माेठ्या प्रमाणात उमेदवार पुढे अाले अाहेत. निवडणुकीत पक्ष मुस्लिम अािण दलित बहुल भागात उमेदवार उभे करणार अाहेत. पक्ष ८० टक्के समाजकारण कररीत असून, नागरिकांच्या समस्यांसाठी विविध अांदाेलन करण्यात अाल्याचा दावा एमअायएमच्या नेत्यांनी केला. 

पत्रकार परिषदेला जावेद रंगनवाल, माे. अतिक, इमरान हबीब खान, मुशर्रफ खान, फिराेज खान, रहेमान खान, कादर माेहम्मद खान, मजीद खान, माे. रफिक, जमीर नजीर शेख, गुलाम दस्तगीर, सैय्यद अामिर, युसुफ शाह, सलार खान, जुनेद खान, सैय्यद वािसम, हकिम खान, साजिद अहमद, माे. कलिम, माे. नदिम, नितीन जाधव यांच्यासह एमअायएमचे पदाधिकारी उपस्थित होते. 

एमअायएममधील फूट इतर पक्षांच्या पथ्यावर 
अल्पसंख्यांक, दलितांसाठी अत्यंत आक्रमकपणे, कोणताही आड पडदा ठेवता पुढाकार घेणारा अशी एमआयएमची ओळख आहे. अल्पसंख्यांक समाज हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदार अाहे. एमआयएममधील फूट, पक्ष संघटनेतील कमकुवतपणा ही िवराेधी पक्षांच्या पथ्यावर पडणार अाहे. 

निवडणुकीमध्ये हाेणार घमासान 
अकोला महापालिकेत ७३ पैकी १९ नगरसेवक मुस्लिम आहेत. या सर्व नगरसेवकांची मोट बांधण्यास एमआयएमला यश आल्यास अकोल्यातील राजकीय चित्रच बदलून जाणार अाहे. मात्र, अाता एमअायएमचे नेते पक्ष बांधणी कशी करतात, यावर बऱ्याच गाेष्टी अवलंबून अाहेत, असे जाणकारांचे म्हणणे अाहे. 

पक्ष बांधणीचे अाव्हान 
एमअायएममध्ये जिल्ह्यात सुरुवातीपासूनच घमासान सुरु अाहे. एक वेळा संपूर्ण कार्यकारीणीच बदलली. त्यानंतर महाचिव अासिफ अहमद खान यांच्यासह सय्यैद नासीर, तैसिफ अहमद माेंटु, शेख जीलानी, वसीम खान पठण, शेख इब्राहिम, सैय्यद अारिफ यांनी राजीनामे दिले हाेते. एमअायएममध्ये सामाजिक कार्य करण्याचे स्वातंत्र नसून, पक्षात शिस्त नसल्याचा अाराेप त्यांनी केला हाेता. पत्रकार परिषदेतही जुने चेहरे खूप कमी दिसत हाेते. मात्र सर्वच नेते पक्षाच्या साेबत असल्याचा दावा महागराध्यक्ष जमीन खान यांनी केला. 
बातम्या आणखी आहेत...