आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्त पदांना ‘खो’: अकोटला टपाल वाटपासाठी रोजंदारीवरील मुले कामाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट येथील पोस्ट ऑफीसची इमारत - Divya Marathi
अकोट येथील पोस्ट ऑफीसची इमारत
अकोट - सध्या ई-मेल, फॅक्स, भ्रमणध्वनीवरील संदेश व्हीडिओ काॅल आदी अत्याधुनिक संपर्काची माध्यमे सर्वसामान्याच्या आवाक्यात आली असली, तरी पोस्टाचे महत्त्व कमी झाले नाही. शासकीय पत्रव्यवहार अद्यापही पोस्टाद्वारे होत असल्याने पोस्टाचे महत्त्व अबाधित आहे. मात्र, गावाचा वाढता पसारा सेवानिवृत्त होणाऱ्यांच्या जागेवर अद्याप नवीन नियुक्त्या झाल्याने पोस्टाची पत्र वाटण्यासाठी रोजंदारीवरील मुलांची मदत अकोटच्या पोस्ट आॅफीसमध्ये घेण्यात येत आहे. तसेच अकोटच्या महत्त्वपूर्ण पोस्ट आॅफीसमध्ये कायमस्वरूपी पोस्टमास्तर उपपोस्टमास्तर नसल्याने त्यांचा कार्यभार प्रभारी सांभाळत आहेत. 
 
पोस्टाद्वारे शासकीय पत्रव्यवहार केला जातो. सोबतच लग्नसमारंभाच्या पत्रिका अजुनही पोस्टानेच पाठवल्या जातात. भारतीय जीवन बिमा निगमच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची प्रमाणपत्रे, कोर्टाच्या नोटीसेस, टेलिफोनची देयके आदींसह घरगुती पत्रव्यवहार अद्यापही पोस्टावर अवलंबून आहे. 
 
या सर्व पत्रव्यवहारावर आधुनिक संपर्क साधण्याचा परिणाम झाला आहे. त्या पत्रांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. पण, पूर्वीच्या तुलनेत गावाचा विस्तार फार मोठा झाला आहे. 
अकोला मार्ग, दर्यापूर मार्ग, अंजनगाव मार्ग, हिवरखेड मार्ग, पोपटखेड मार्ग अशी सर्वच बाजूने गावाची वाढ झाली आहे. या नवीन वस्त्यांसाठी पोस्टमनची संख्या मात्र वाढवली नाही. त्यामुळे पत्राची संख्या काही प्रमाणात कमी झाली असली तरी पोस्टमनच्या पत्र वाटपाचा एरिया मात्र वाढला आहे. 
 
पेयजल नाही, सिसिटिव्ही हवेत : ग्राहकांसाठी पेयजलाची कोणतीही व्यवस्था नाही. आर्थिक व्यवहार असल्याने, सिसिटिव्ही कॅमेराची गरज आहे. पण, ती व्यवस्था नाही. या महत्त्वपूर्ण गोष्टीकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 

पत्रपेट्या हव्यात : शहरातफ्लॅट स्कीम पुष्कळ झाल्यात पण तळमजल्यावर पत्र पेट्या नसल्याने पोस्टमनला जिने चढून वर जावे लागते. तसेच शहरात जवळपास फक्त १८ ठिकाणीच पत्र पेट्यांची सुविधा असल्याचे समजते. 
 
स्टेशनरी प्रिंटरची भासतेय चणचण 
अकोटच्या पोस्ट ऑफीसमध्ये स्टेशनरी प्रिंटरची बऱ्याचदा चणचण भासते. दरवेळी पत्रव्यवहार करून संबंधित साहित्य अकोला येथून मागवावे लागते. 
 
पोस्टमास्तर निवृत्त अथवा बदली झाल्याने हिवरखेडचे ई. एस. खान यांच्याकडे तात्पुरता प्रभार जिला आहे. तसेच गेल्या ते वर्षांपासून अकोट येथील पोस्ट आॅफीसमध्ये पोस्ट मास्तर उपपोस्ट मास्तर कायमस्वरूपी जागा भरल्या गेल्याने त्या ठिकाणावरील कारभार प्रभारींकडे देण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण पदावर कायमस्वरूपी पोस्टमास्तर उपपोस्ट मास्तर या महत्त्वपूर्ण ठिकाणावर मिळणे गरजेचे आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. 

अकोटच्या पोस्टातील अशी आहे सद्य:स्थिती 
पोस्टमास्तर प्रभारी (रिक्त) 
उपपोस्टमास्तर प्रभारी (रिक्त) 
पोस्टमन - चार कार्यरत, जागा रिक्त (रोजंदारीवर) 
पोस्टल असिस्टंट पूर्ण आहेत 
एमटीएस -३ कार्यरत, रिक्त 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...