आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानगरात आजपासून समता पर्वाचे आयोजन, 10 ते 14 एप्रिलदरम्यान भरगच्च कार्यक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- डॉ.पंजाबराव देशमुख यांचा १० एप्रिल रोजी स्मृतीदिन असून तेव्हापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे १४ एप्रिलपर्यंत समता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजन समितीचे डॉ. पुरुषोत्तम तायडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 
यावेळी संयोजन समितीचे मार्तंडराव माळी, मनोज आेहेकर, डॉ. दिलीप सराटे, डॉ. संतोष हुशे, प्रा. प्रदीप चोरे, डॉ. रणजित कोरडे, पंकज जायले, संजय गवई, मधू कसबे प्रामुख्याने उपस्थित होते. आठ वर्षांपासून शहरात समता पर्व साजरे करण्यात येत आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा समतेचा विचार समाजात पोहचवणे हा मुख्य उद्देश आहे, असे डॉ. तायडे यांनी सांगितले. 
 
सोमवार, १० एप्रिल रोजी श्री शिवाजी महाविद्यालयात डॉ. भाऊसाहेब देशमुख यांचा स्मृतिदिन कार्यक्रम होणार आहे. प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. ११ एप्रिल रोजी सकाळी वाजता महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अशोकवाटिकेत कार्यक्रम होणार आहे. 

१२ पासून प्रमिलाताई आेक सभागृहात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी वाजता मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पटोकार अध्यक्षस्थानी राहतील. मार्तंडराव माळी, प्रा. डॉ. संतोष हुशे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जमाते इस्लामीचे हामीद हुसेन यांच्या उपस्थितीत, ‘शेतकऱ्यांची दशा, दिशा’ या विषयावर गजानन अमदाबादकर कारंजा यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर, ‘भारतीय संविधान आमची जबाबदारी’ या विषयावर एमपीजेचे राज्य सदस्य अजीम पाशा यांचे व्याख्यान होईल. १३ एप्रिल रोजी सायंकाळी वा. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेत आणि डॉ. सुभाष भडांगे, प्राचार्य डॉ. सिकची, बौद्ध महासभेचे रवींद्र दरोकार, ज्येष्ठ विचारवंत पी. जे. वानखडे, विजय जाधव यांच्या उपस्थितीत ‘लोकशाही समोरील आव्हाने’ या विषयावर माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखडे नागपूर यांचे व्याख्यान होईल. प्रख्यात गायिका रसिका बोरकर हिचा गौरव करण्यात येईल. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सकाळी वाजता अशोकवाटिका येथे समता पर्वाच्या वतीने अभिवादन सभा होणार आहे. तेव्हा नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...