आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८७१ कुटुंबातील न्यायप्रविष्ट भांडणे मिटली; ५.२८ कोटींची तडजोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील ८७१ कुटुंबीयांद्वारे आपसातील न्यायप्रवीष्ट भांडणे एकाच वेळी निस्तारण्याचा अभिनव प्रसंग शनिवारच्या राष्ट्रीय लोकअदालतीत दिसून आला. या घटनेमुळे न्यायाधीशांच्या साक्षीने कोटी २८ लाख ४५ हजार १७३ रुपयांची तडजोड पूर्ण आली. 
जिल्ह्याच्या अलीकडच्या तडजोडवादी इतिहासातील ही महत्त्वाची घटना असून कोट्यवधींच्या या व्यवहारामुळे बीएसएनएल व्होडाफोनसारख्या टेलिफोन कंपन्या आणि बँका, महावितरणालाही फायदा झाला. शिवाय शेतीचे दावे, जमिनीचे खटले, घरभाड्याचा तंटा, पती-पत्नींमधील कलह, कामगार-मालक यामधील दुरावा छोटे-मोठे सीमावादही संपुष्टात आले. 
िदल्लीचे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या निर्देशानुसार हे लोकन्यायालय भरविण्यात आले होते. स्थानिक पातळीवरील जिल्हा सत्र न्यायालय आणि तालुका पातळीवरील न्यायालयांमध्येसुद्धा अदालत भरविण्यात आल्याने िजल्हाभर शनिवारी समन्वयाचे वातावरण होते. 

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली हजार ३१२ आणि हजार २१७ दाखलपूर्व अशी एकूण हजार ५२९ प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवण्यात आली होती. त्यापैकी ८७१ प्रकरणांचे निवाडे केले गेले. यामध्ये ९२ दाखलपूर्व प्रकरणांचाही समावेश आहे.
लोकन्यायालयातील सर्व १५ पॅनलवर प्रत्येकी एक न्यायाधीश, वकील समाजसेवक यांचा समावेश होता. प्रबंधक ए. एस. लव्हाळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक राजेन्द्र निकुंभ, वरिष्ठ लिपिक एस. पी. टाकळीकर, कनिष्ठ लिपिक विशाल पोहरे, के. जे. पांडे शाहबाजखाँन आदी कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली. तर असंख्य नागरिकांना लाभ मिळाला. 

भूसंपादनाच्या डझन भर खटल्यांचा निवाडा 
लोक अदालतमध्ये भूसंपादनाची एकूण ४६ प्रकरणे तडजोडीकरीता ठेवण्यात आली होती. त्यापैकी १२ प्रकरणे निकाली निघाली. यामुळे दोन्ही बाजूचे पक्षकार आनंदी झाले. यासाठी अॅड. मनीष खरात यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे विधी सेवा प्राधिकरणाचे म्हणणे आहे. 

कौटुंबिक, कामगार न्यायालयात अदालत 
जिल्ह्यातील सर्व दिवाणी फौजदारी न्यायालये, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, ग्राहक तक्रार निवारण मंच येथेही राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे तेथेही स्वतंत्रपणे खटल्यांचा निवाडा झाला. 
 
बातम्या आणखी आहेत...