आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट; ‘धोंडी धाेंडी पाणी दे’ चा घुमतोय गजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मागील आठ ते दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील दोन लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. तर लाख ३२ हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात सापडली आहेत. यंदा सर्वाधिक कमी पाऊस घाटाखाली तालुक्यात पडला आहे. त्यामुळे जुलैपर्यंत या तालुक्यात केवळ ४५ टक्के पेरणी झाली आहे. निसर्गाने कृपादृष्टी टाकून पावसाला सुरुवात करावी, अशी याचना करत ग्रामीण भागात धोंडी धोंडी पाणी दे चा गजर घुमत आहे. प्रत्येक दिवस पाण्याविना कोरडा जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. 

कधी नव्हे यंदा वेळेवरच जूनला मृग नक्षत्रात पावसाला प्रारंभ झाला होता. जिल्ह्यात तब्बल दोन ते तीन दिवस चांगला पाऊस झाला. पावसाळा सुरू झाला असे समजून शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. मात्र त्यानंतर पावसाने सात ते आठ दिवस दडी मारली होती. त्यानंतर उशिरा का होईना २८ जून रोजी जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. दोन दिवस रिमझिम पाऊस पडला. या पावसामुळे लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकांना जीवदान मिळाले. तर रखडलेल्या पेरण्यांना शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती. जुलै अखेर जिल्ह्यात लाख ४८ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी लाख ३२ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली. त्याची टक्केवारी ७१ टक्के आहे. परंतु ही पेरणी होत नाही तोच पुन्हा १० ते १२ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पावसाअभावी पिके पिवळी पडून खाली माना टाकण्यास सुरुवात केली आहे. पावसाचा पत्ता नसल्यामुळे आजही जिल्ह्यातील दोन लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यातच दररोज कडक ऊन पडत असल्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होत आहे. पिकांना वाचवण्यासाठी अनेक शेतकरी विहिरीतील पाण्याद्वारे सिंचन करत आहेत. परंतु ज्यांच्याकडे पाण्याच्या व्यवस्था नाही, अशा शेतकऱ्यांना डोळ्यासमोर पिकाचे नुकसान पाहावे लागत आहे. 
त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या. दररोज चातकासारखी पावसाची वाट पाहात आहेत. पावसासाठी ग्रामीण भागात धोंडी धोंडी पाणी दे चा गजर घुमू लागला आहे. विशेष म्हणजे घाटाखालील जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर नांदुरा तालुक्यात सर्वाधिक कमी पाऊस झाल्यामुळे या तालुक्यात केवळ ४५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. वास्तविक पाहता जिल्ह्यातील पावसाचे सरासरी प्रमाण हे ७१२.७ एवढे आहे. परंतु जून महिना संपला असताना देखील आतापर्यंत केवळ १९८.०५ मिमी. एवढाच पाऊस झाला असून, त्याची टक्केवारी २७.८५ एवढी आहे. 

जिल्ह्यामध्ये अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्यामुळे नदी, नाल्यांना पूर गेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत पावसाने हजेरी लावली नाही, तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यंदा मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर अपेक्षुनसार पाऊस पडला नाही. मध्यंतरी तुरळक पाऊस झाला असला तरी त्यानंतरही पावसाने दडी मारल्याने कोवळी पिके पिवळी पडून माना टाकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली अाहे. 

जिल्ह्यात झालेली खरिपाची पेरणी 
जिल्ह्यात आजपर्यंत लाख ३२ हजार ५८७ हेक्टर क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये चिखली तालुक्यात ८८ हजार २२. हे., बुलडाणा ५४९२० हेक्टर, देऊळगावराजा ३५९४६ हे., मेहकर ८४१४६ हे., सिंदखेडराजा ५७१६७, लोणार ५१ हजार ८८०, खामगाव ५५९१०, मोताळा ५२१५८ हेक्टर, तर सर्वात कमी जळगाव जामोद ५३७८, शेगाव १६०४० हे, संग्रामपूर १५५९५, मलकापूर ९३२२ हे. नांदुरा तालुक्यात नाममात्र हजार १०३ हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी करण्यात आली आहे. 

घाटाखालील पावसाचे प्रमाण कमी 
घाटाखालील जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर नांदुरा या तालुक्यात सर्वाधिक कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यात नाममात्र ४५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. अद्यापही या तालुक्यातील लाखो हेक्टर क्षेत्रावरील पेरणीरखडली आहे. त्यामुळे घाटाखालील शेतकर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. 
 
आजपर्यंत जिल्ह्यात झालेला पाऊस 
जिल्ह्यात जुलैअखेर २५८०.६ मिमी. पाऊस झाला. त्यामध्ये बुलडाणा २८९ मिमी., चिखली २२४, देऊळगावराजा १६२, सिंदखेडराजा २१९.४, लोणार २२१, मेहकर २७७, खामगाव १८०.२, शेगाव १२२, मलकापूर १२६, नांदुरा २४१, मोताळा २१३, संग्रामपूर ९८, जळगाव जामोदे २०८ मिमी. पावसाची नोंद केली. 

 
बातम्या आणखी आहेत...