आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामधील हजारो हेक्टर शेतजमीन बनली ‘सुपीक’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - शासनाचा एक पैसाही खर्च करता लोकसहभागाच्या माध्यमातून बुलडाणा पाटबंधारे विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील कोरड्याठाक पडलेल्या एक मध्यम पन्नास लघु प्रकल्पातून लाख ६२ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. ही आकडेवारी २२ मे पर्यंतची असून आजपावेतो जवळपास लाख १२ हजार घनमीटर गाळ काढण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या विश्वसनिय सुत्राने दिली आहे. प्रशासनाच्या या विकासाभिमूख उपक्रमास शेतकऱ्यांनी सुध्दा उत्स्फुर्त असा प्रतिसाद देवून हा गाळ आपल्या शेतात नेवून टाकला आहे. या गाळामुळे हजारो हेक्टर जमीन सुपीक बनली आहे. शिवाय गाळ काढल्यामुळे भविष्यात प्रकल्पातील पाणी साठ्यात भरमसाठ वाढ होवून अनेक गावांची पाणीटंचाई संपुष्टात येण्यास मदत मिळणार आहे. गाळमुक्त धरण उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 
 
मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात जिल्ह्यातील मध्यम लघु प्रकल्पात पाहिजे त्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला नाही. डिसेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे काही प्रमाणावर प्रकल्पात जलसाठा निर्माण झाला होता. त्यातच पाण्याचा होत असलेला भरमसाठ उपसा, उन्हामुळे होत असलेले पाण्याचे बाष्पीभवन यासह इतर कारणामुळे जिल्ह्यातील जवळपास ५५ लघु प्रकल्प मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरडेठाक पडले आहेत. त्यामध्ये बुलडाणा पाटबंधारे विभागातील पन्नास लघु प्रकल्पाचा समावेश आहे. पाण्याअभावी मध्यम लघु प्रकल्प आटल्यामुळे अनेक शहर गावाच्या पाणी पुरवठा योजना प्रभावीत झाल्या आहेत. परिणामी अनेक गावात पाणी टंचाईने डोके वर काढले आहे. सध्या स्थितीत पाणी टंचाईवर उपाययोजना म्हणून प्रशासनाच्या वतीने अनेक गावांना शंभर टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान भविष्यातील पाणी टंचाई संपुष्टात आणून सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, या विकासाभिमूख उद्देशाने बुलडाणा पाटबंधारे विभागाने शासनाचा एक पैसाही घेता लोक सहभागातून आपल्या कार्यक्षेत्रातील कोरड्याठाक पडलेल्या एक मध्यम प्रकल्पासह पन्नास लघु प्रकल्पातील गाळ काढण्यास सुरूवात केली आहे. शेतकऱ्यांनी सुध्दा या उपक्रमास भरपूर प्रतिसाद देवून स्वखर्चाने हा गाळ ट्रॅक्टरव्दारे आपल्या शेतात नेवून टाकला आहे. मेहकर, चिखली, मलकापूर या उप विभागातील कोरड्या पडलेल्या प्रकल्पातून तब्बल लाख ६२ हजार ५९४ घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. ही आकडेवारी २२ मे अखेरची असून आतापर्यंत पाटबंधारे प्रशासनाने लाख १२ हजार घनमीटर गाळ काढण्यात आल्याची माहिती अधिकृत सुत्राने दिली आहे. त्यामध्ये मेहकर उपविभागातील प्रकल्पातून लाख हजार १०९ तर त्या खालोखाल चिखली उपविभागातील प्रकल्पातून लाख ५० हजार २७६ घनमीटर, मलकापूर हजार १९१ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी गाळ शेतात टाकल्यामुळे जवळपास हजारो हेक्टर शेती सुपीक बनली आहे. त्यामुळे निसर्गाने साथ दिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात निश्चीत वाढ होणार आहे. शिवाय गाळ काढल्यामुळे प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी शासनाचा एकही पैसा खर्च करण्यात आला नाही. 

प्रकल्पातून काढण्यात आलेला गाळ : बुलडाणा पाटबंधारे विभागांतर्गत येत असलेल्या मेहकर उप विभागातील कोरड्या पडलेल्या २४ प्रकल्पातून लाख हजार ११९ तर चिखली उप विभागातील २६ प्रकल्पातून लाख ५० हजार २७५ , मलकापूर विभागातील पलढग या मध्यम प्रकल्पातून हजार १९८ घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. 

इतर विभागाने उपक्रम सुरू करण्याची गरज 
सिंचन क्षेत्रात वाढ होवून पाणी टंचाई संपुष्टात यावी, या उद्देशाने बुलडाणा पाटबंधारे विभागाने शासनाचा एकही पैसा खर्च करता लोकसहभागातून गाळ काढण्याचा विकासाभिमूख उपक्रम राबविला आहे. इतर पाटबंधारे विभागाने सुध्दा हा उपक्रम राबविण्याची गरज आहे. विशेष म्हणजे कोरड्या पडलेल्या प्रकल्पातून गाळ काढण्यामध्ये बुलडाणा विभाग हा राज्यात अव्वल ठरला आहे. 

गाळ नेवून शेतकऱ्यांनी शेतजमीन सुपीक बनवावी 
^गेल्या काही दिवसापासून लोकसहभागाच्या माध्यमातून कोरड्या पडलेल्या प्रकल्पातून गाळ काढण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात गाळ टाकला आहे. उर्वरीत शेतकऱ्यांनी सुध्दा प्रकल्पातील गाळ नेवून आपली शेती सुपीक बनवावी. प्रकल्पातील गाळ नेण्यास कोणी मनाई करीत असेल तर त्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधावा.’’ राजेश हुमने, कार्यकारी अभियंता 
बातम्या आणखी आहेत...