आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जदार शेतकऱ्यांनी आवश्‍यक ती माहिती जिल्‍हा बँकेत द्यावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबर रोजी संपत आहे. या योजनेस पात्र होण्यासाठी कर्जदार सभासदाने ऑनलाइन अर्ज भरणे तसेच आवश्यक ती कागदपत्रे माहिती संबंधित जिल्हा बँक शाखेत सादर करणे आवश्यक आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी कर्जमाफीस पात्र होण्याकरिता आवश्यक माहिती त्वरित उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनी केले आहे. 
 
कर्जमाफीस पात्र होण्यासाठी बँकेकडे आधार कार्ड, केवायसी कागदपत्रे देणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडे आधार कार्ड दिलेले नाही. त्यांनी त्वरित आधार कार्ड जमा करावे. शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेव्यतिरिक्त इतर बँकांकडून कर्ज घेतले असले तरी त्यांना एकूण दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी जिल्हा बँक आणि इतर बँकांकडे आधार कार्ड, केवायसी कागदपत्रे जमा करावी. शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त बँकाकडून कर्ज घेतले असतील एकाच बँकेच्या कर्जाचा ऑनलाइन अर्जामध्ये उल्लेख केला असेल, तर त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जामध्ये दुरुस्ती करून जिल्हा बँकेसह सर्वच बँकांच्या कर्जाची आणि बचत खात्याची माहिती सुविधा केंद्रावर जाऊन ऑनलाइन अर्जामध्ये अपडेट करून घ्यावी. 

जिल्हा बँकेचे कोअर बुकिंग झालेले असल्यामुळे ग्राहकांच्या खाते क्रमांकामध्ये बदल झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरताना जिल्हा बँकेचा नवीन खाते क्रमांक दिलेला नाही. त्यांनी जिल्हा बँकेमध्ये आवश्यक केवायसी कागदपत्रे सादर करून नवीन खाते क्रमांक प्राप्त करून ही माहिती ऑनलाइन फॉर्ममध्ये अपडेट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...