आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किसानपुत्रांचा अॉक्टोबरला राहील बेडी तोडो संकल्प दिन, 1000 सत्याग्रही निर्माण करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर- किसानपुत्र आंदोलन दोन अॉक्टोबरला बेडी तोडो संकल्प दिन साजरा करणार असून, किसानपुत्र आंदोलनाची शपथ निश्चित करुन १००० सत्याग्रही निर्माण करण्याचा निर्धार पुण्यातील रविवार (९) च्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती आंदोलनाचे प्रणेते ज्येष्ठ समाजसेवक अमर हबीब यांनी भ्रमण दूरध्वनीवरून दिली. 
 
ते म्हणाले, या बैठकीत, आंदोलनाची शपथ, सत्याग्रहींची नोंदणी, निधी, बेडी तोडो संकल्प दिन तयारी, निमंत्रक समिती, सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर याबाबत सविस्तर चर्चा करुन धोरण अंमलबजावणीची आखणी करण्यात आली. महाराष्ट्रातून किसानपुत्र आंदोलनाच्या १००० सत्याग्रहींची नोंदणी करण्यात येईले,असेही सांगण्यात आले. 
 
ऑक्टोबर संकल्प दिन : किसानपुत्र आंदोलनाचे सत्याग्रही दोन ऑक्टोबर रोजी आपापल्या ठिकाणी एक तासाचे मौन पाळतील. मौनाचा समारोप मान्यवर विधिज्ञाच्या हस्ते केला जाईल. बेडी वर हातोडी मारून शेतकरी विरोधी कायद्यांच्या बेड्या तोडण्याचा संकल्प केला जाईल. हा कार्यक्रम व्यापक प्रमाणात व्हावा यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जातील. 
 
तुमचा खिसाच किसानपुत्र आंदोलनाची बँक : या कल्पनेनुसार वाटचाल केली जाईल. ज्यांना देणगी द्यायची आहे अशा मित्रांनी आकडा सांगावा. तो हवा तर जाहीर केला जाईल. नाव जाहीर करायचे नसेल, तर त्या ऐवजी कोड नंबर जाहीर केला जाईल. जो देणगीदारालाही कळविला जाईल.किसानपुत्र आंदोलन हे शेतकऱ्यांच्या मुला मुलींचे आहे. ते त्यांनीच चालवायचे आहे. 
 
निमंत्रक समिती : महाराष्ट्रातील प्रत्येक महानगरात किमान तीन सदस्यांची किसानपुत्र आंदोलन, निमंत्रक समिती असेल. महानगर या नावाने ही समिती ओळखली जाईल. पुण्याची किसानपुत्र आंदोलन निमंत्रक समिती अरुण यावलीकर, प्रदीप गुट्टे, राहुल बोरसे या तीन जणांची असेल. पुण्यातील कामाचे नियोजन ती करेल. 
 
सोशल मीडिया : कर्ज बेबाकीला नकार देणारी किसानपुत्रांचे अभिनंदन करण्यात आले. ही चळवळ व्यापक करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दर सोमवारी शेतकरीविरोधी कायदे रद्द जाळे पाहिजे, असे सोशल मीडियावर टाकावे, सोशल मीडियाचा वापर अधिक प्रभावीपणे करावा. असेही या बैठकीत ठरवण्यात आले. 
 
सत्याग्रहींची नोंदणी 
महाराष्ट्रातून किसानपुत्र आंदोलनाच्या १००० सत्याग्रहींची नोंदणी करण्यात येईल. ती १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करायची आहे. kisanputra.in या वेबसाईटवर online नोंदणी करता येईल. तसेच राज्यातील महानगर निमंत्रक समन्वय समितीचे सदस्य यांच्याकडेही सत्याग्रह नोंदणीचे फॉर्म उपलब्ध राहतील. 
 
निधींविषयी निर्णय 
आंदोलनाला आर्थिक मदत देण्याची ईच्छा अनेकांनी व्यक्त केली. आंदोलन नोंदणीकृत संस्था नाही संघटनाही नाही, त्यामुळे देणगी स्वीकारू शकणार नाही.आंदोलनाचा खर्चही आंदोलकांनीच करावा. अशी या आंदोलनाची भूमिका आहे. एखाद्या मोठ्या कामासाठी पैसे लागणार असतील तर त्या कार्यक्रमाचा अमुक खर्च परस्पर द्या या पद्धतीने मदत स्वीकारता येईल. या करिता देणगी देऊ इच्छिणाऱ्यांची यादी केली जाईल. 
 
किसानपुत्र आंदोलन शपथ... 
मी शपथ घेतो की, शेतकरी, महिला अन्य सर्जकांचे लाचारीचे कुंठेचे जिणे संपवून, त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने, सुखाने स्वतंत्रपणे जगता यावे यासाठी, मी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेन. त्याकरीता, शेतकऱ्यांना गळफास ठरलेले शेतजमीन कमाल धारणा कायदा, आवश्यक वस्तूंचा कायदा जमीन अधिग्रहण कायदा अन्य शेतकरीविरोधी कायदे संपुष्टात यावे यासाठी मी सतत कार्य करेन. या कार्यात, जात, धर्म, पंथ, पक्ष अशा कोणत्याही भेदाभेदांचा अडथळा येऊ देणार नाही’, अशी शपथ निश्चित केली. 
 
 
बातम्या आणखी आहेत...