आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाण्‍यात 8 महिन्यात 186 शेतकऱ्यांची आत्‍महत्‍या, अनेक कुटुंब मदतीपासूनही वंचित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - सततची नापिकी, डोक्यावर कर्जाचा डोंगर, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, वाढती महागाई, यासह अन्य कारणांमुळे जिल्ह्यात आजपर्यंत हजार २४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर गेल्या आठ महिन्यात तब्बल १८६ शेतकऱ्यांनी जीवनाला कंटाळून मृत्यूला कवटाळले आहे. मात्र, शासनाच्या निष्ठावंत पाईकांनी शेतकरी आत्महत्येपैकी केवळ हजार ५२ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरवले आहेत. तर तब्बल हजार ५८ प्रकरणे अपात्र ठरवली आहेत. यावरही कळस म्हणजे हजार १५८ शेतकऱ्यांनी घरगुती वादातून व्यसनाधिनतेने आत्महत्या केल्याचा जावाई शोध लावून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासकीय मदतीपासून वंचित ठेवले आहे. जिल्ह्यात दिवसागणिक वाढत जाणारा शेतकरी आत्महत्येचा आलेख पाहता शासन प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली. 
 
मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी कधी ओल्या, तर कधी कोरड्या दुष्काळामुळे गळफास किंवा विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवत आहेत. यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. मात्र या पेरणीचाही काही फायदा झाला नाही. त्यातच गेल्या १० ते १२ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. अद्याप तुरीच्या चुकाऱ्याचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण कसे, करावे, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यातून कुठलाच पर्याय सापडल्याने दर दोन तीन दिवसाआड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात तब्बल १८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ७२ शेतकरी आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरल्या, तर ७६ प्रकरणे अपात्र ठरवले आहेत. यावरही कळस म्हणजे ७६ शेतकऱ्यांनी घरगुती भांडण व्यसनाधिनतेने आत्महत्या केल्याचा जावाई शोध लावून त्यांच्या कुटुंबाला मदतीपासून वंचित ठेवले. वास्तविक पाहता जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी व्हावे, त्यांचे मनोबल उंचवावे, यासाठी शासनाने शेतकरी पॅकेज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी आतापर्यंतच्या २२४८ शेतकरी आत्महत्येपैकी केवळ हजार ५२ प्रकरणे मदतीसाठी पात्र, तर ११५८ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरवली आहेत. मागील आठ महिन्यांत झालेल्या १८६ शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणांपैकी ३८ प्रकरणे अद्याप संबंधित तहसीलदारांकडे प्रलंबित आहेत. 
 
ठोस उपाययोजना करण्याची गरज : जिल्ह्यातील शेतकरी अात्महत्येचा आलेख चढत अाहे. शेतकरी आत्महत्यांना आळा घालण्यासाठी शासन प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच शेतकरी आत्महत्या का करत आहे, याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. 
 
शेतकरी पॅकेज ठरले फोल : सात वर्षांपूर्वी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने हजार ७३ कोटींचे पॅकेज जाहीर केले. परंतु या पॅकेजचा फायदा शेतकऱ्यांना होता डबघाईस आलेल्या सहकारी बँकांनाच अधिक झाला. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा आलेख चढत आहे. 
बातम्या आणखी आहेत...