आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ ३४ टक्के कर्जाचे वाटप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - एकिकडे पावसाने दडी मारली असून, दुसरीकडे खरीप हंगामासाठी एकूण लक्षांकाच्या तुलनेेने केवळ ३३.९४ टक्के कर्जाचे वितरण झाले अाहे. एकूण कर्ज वितरणाचे एकूण लक्षांक हजार १४० काेटी ५५ लाख हाेते, त्यापैकी ३८७ काेटी रुपयांचे वितरण करण्यात अाले. त्यामुळे जिल्ह्यातील शेती शेतकरी अडचणीत सापडले अाहेत. 
 
गतवर्षी पावसाने जून जुलै महिन्यात दमदार हजेरी लावली हाेती. मात्र १० अाॅगस्टनंतर काही दिवस पावसाने दडी मारल्याने काही भागात सोयाबीनसह काही पिकांचे उत्पादन घटले हाेते. त्यानंतर झालेल्या पावसाने काही भागात समाधानकारक उत्पादन झाले हाेते. मात्र यंदा तर जून महिन्यात काही भागात पाऊस झाला. त्यामुळे काही तालुक्यात पेरणीही झाली. मात्र त्यानंतर पाऊस रुसल्याने अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर अाेढवले अाहे. 

येत्या ते दिवसात पाऊस पडल्यास सर्वच ठिकाणी दुबार पेरणी करावी लागणार अाहे. परिणामी यापूर्वी केलेली मशागत, पेरणी, मजुरीचा खर्च वाया जाणार अाहे. अाता दुबार पेरणीची वेळ अाल्यास शेतकऱ्यांना परत कर्जासाठी बँकेकडे जावे लागणार अाहे. खरिपाच्या पीक पेरणीसाठी अद्याप शेतकऱ्यांना १०० टक्के कर्ज वितरण करण्यात अालेले नाही. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना आता पीककर्जाची प्रतिक्षा आहे. 

गतवर्षी झाले हाेते ८२२ काेटीचे वितरण : सन२०१६-१७ मध्ये खरीप हंगामासाठी एकूण ९८६ काेटी रुपयांच्या वितरणाचे लक्ष निश्चित करण्यात अाले हाेते. त्यापैकी ८२२ काेटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात अाले. रब्बी हंगामातील ५० काेटी रुपये एवढा लक्षांक हाेता. त्यापैकी ३० काेटी रुपयांचे वितरण करण्यात अाले. 

१० हजाराच्या मदतीकडे पाठ कि प्रक्रियाच क्लिष्ट? : खरीपपिकासाठी तातडीने १० हजार रुपयांच्या अग्रीम कर्ज िवतरणाला १९ जून राेजी प्रारंभ झाला हाेता. १० हजारासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या जवळपास १९ हजार अाहेत. अातापर्यंत जिल्ह्यात केवळ १३६ शेतकऱ्यांना कर्ज मिळाले अाहे. हे कर्ज मिळण्यासाठी अर्ज, ७/१२, कर्जासाठी पात्र असल्याचे स्वयंघाेषित शपथपत्र सादर करावे लागत अाहे. मात्र शेतकऱ्यांची अत्यल्प संख्या लक्षात घेता या याेजनेला शेतकऱ्यांचाच प्रतिसाद नाही, िक प्रक्रियाच क्लिष्ट करुन ठेवली, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत अाहेत. 

अाकडे बाेलतात 
बॅंकलक्षांक शेतकरी वितरीत कर्ज 
जिल्हाबॅंक ५५५२८.०० ३२२१० २४१५५.८९ 
राष्ट्रीयकृत बॅंका ४२८७६ ४३९१ ४२८३.०० 
खासगी बॅंका ३८३२.०० ६७३ ११२८.०० 
ग्रामीण बॅंका ११८१९.०० २२१२ २१२७ 

शेतीवर परिणाम हाेईल 
^यंदा अातापर्यंत३१८ काेटीचेच कर्ज वितरीत करण्यात अाले अाहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा असल्याने अनेकांनी कर्जच भरले नाही. यंदा कमी कर्ज वितरीत झाले असून, पावसानेही दडी मारली. याचा परिणाम कृषीवर हाेणार असून, शेतकरी अाणखी अडचणीत सापडणार अाहे.’’ प्रशांत गावंडे, शेतकरी जागर मंच. 
 
 
बातम्या आणखी आहेत...