आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्यांचे’ डोळे पैसे, पावसाकडे; थकबाकीदारांना मिळेल लाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - खरीप पिकासाठी १० हजारांंचे कर्ज शेतकऱ्यांना देण्याच्या शासन अादेशाची अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी शेतकरी पैसे केव्हा मिळतील, केव्हा बियाणे खरेदी करु, या विवंचनेत अाहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक सोमवारपासून कर्ज वितरणाची प्रक्रिया सुरु करणार असली तरी मदतीसाठी दस्तावेज सोपस्कार लक्षात घेता शेतकऱ्यांच्या हातात केव्हा पैसा मिळेल, हे तरी काेणीच ठामपणे सांगू शकत नाही. कर्जमुक्तीसह इतरही मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या अांदाेलनाची दखल घेत शासनाने कर्जमुक्तीला तत्वत: निकषासह मान्यता दिली. मात्र निकष निश्चितीसाठी अवधी लागणार असल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांना मदत म्हणून १० हजारांंचे कर्ज देण्याचा अादेश सहकार विभागाने १४ जूनला जारी केला. मात्र या अादेशानुसार शेतकऱ्यांना कर्जाचे वितरण सुरु झालेले नाही. 
 
४५हजार ६१९ थकबाकिदार 
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अकाेला, वाशीम जिल्ह्यात ३० जून २०१६पर्यंत थकबाकीदार खाते ४५ हजार ६२९ अाहेत. या खातेदारांचे १८१ काेटी १४ लाख थकले अाहेत. यांना १० हजारांंची मदत मिळणार अाहे. १४ जूनच्या शासन निर्णयातील अटी, निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ िमळेल. 

‘त्यांची’ लूट थांबवा 
^निर्दयी सरकारकडून शेतकऱ्यांची लूट करण्यात येत अाहे. मदतीसाठी निकष, अटींचे अडथळे निर्माण करणे म्हणजे शेतकऱ्यांना जीव घेण्याचा प्रकार अाहे. भाव पडल्याने गतवर्षी जादा उत्पादन झाल्यानंतरही शेतकरी संकटात सापडले. शेतकऱ्यांमध्ये संताप असून, अांदाेलन करण्यात येईल. अविनाश नाकट, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, युवक अाघाडी. 

सरकार संवेदनाहीन 
^तातडीच्या मदतीमध्येही निकष लावून सरकार शेतकऱ्यांचा मानसिक छळ करीत अाहे. वास्तविक सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणे अावश्यक अाहे. शेतकरी अात्महत्येपासून परावृत्त व्हावा, यासाठी उपाय याेजना करणे गरजेचे अाहे. मात्र शेतकऱ्यांबाबत हे सरकार संवेदनाहीन अाहे. श्रीकांतपिसे, रयत रक्षक दल नेते राष्ट्रवादी काॅग्रेस. 

थेट मदत द्यावी 
^उच्चाधिकार मंत्रीगटातील समितीचे सदस्य असलेले शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी शेतकऱ्यांना तातडीने थेट मदत द्यावी, अशी भूमिका घेतली हाेती. त्यामुळे बॅंकांनी तांत्रिक बाबींमध्ये वेळ घालवता शेतकऱ्यांना सोमवारपासून मदत द्यावी. अन्यथा शिवसेना पक्षनेत्यांच्या अादेशाने अांदाेलन करणारआहे. नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख, शिवसेना. 

शेतकऱ्यांसाठीच असे निकष का? 
^शासन उद्याेजकांसह इतरही समाज घटकांना निकषांविनाच अर्थ सहाय्य करते. मात्र शेतकऱ्यांसाठी निकष का? शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी सरकारची मानसिकता नाही. मदतीमध्येही निकषामुळे खऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. त्यामुळे पुन्हा अांदाेलन करु. मनाेजतायडे, अध्यक्ष, शेतकरी जागर मंच 

लवकरच मिळेल प्रत्यक्ष मदत 
^शेतकऱ्यांनातातडीची मदत म्हणून दहा हजार देण्याबाबत सर्व बँकांना कळवले आहे. शासन अादेशनुसार सोमवारपासून पैसे वाटपास सुरुवात हाेईल. बँकांकडून अंतर्गत बाबींची पूर्तता व्हायला वेळ लागत अाहे. तुकारामगायकवाड, प्रबंधक. लीड बँक (सेंट्रल बँक) 

अाजपासून हाेईल वितरणाला सुरुवात 
^जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमध्ये कर्जवितरणासाठी पूरक असलेली प्रक्रिया अंतिम टप्प्यात अाहे. सोमवारपासून सोसायट्यांमार्फत वितरण प्रक्रियेला प्रारंभ हाेईल. यासाठी शेतकऱ्यांना काही कागदपत्रे जमा करावे लागतील. अनंतवैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक, अकाेला. 

शेतकऱ्यांना करावे लागतील कागदपत्रे जमा 
शेतकऱ्यांना१० हजारांंची मदत मिळण्यासाठी सेवा सहकारी सोसायट्यांमध्ये काही कागदपत्रे जमा करावे लागणार अाहे. यात कर्जासाठीचा अर्ज, ७/१२चा, कर्जासाठी पात्र असल्याचे स्वयंघाेषित शपथपत्र अादींचा समावेश अाहे. शेतकरी ३० जून २०१६पर्यंतचा थकबाकीदार अाहे, याचीही खात्री करावी लागेल. यासाठी शेतकऱ्यांचे स्वतंत्र खाते काढणार असून, त्यात पैसे जमा हाेतील. हे प्रक्रिया होण्यास दाेन ते तीन दिवस लागतील, असे तज्ज्ञांचे मत अाहे. 
बातम्या आणखी आहेत...