आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदीजन, आजारग्रस्तांच्या कर्जमाफीचे काय? शेतकरी जागर मंचचा प्रश्‍न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - तुरुंगात असलेले कच्चे, पक्के बंदीजन आणि राज्यभरातील रुग्णालयांमध्ये दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय, असा प्रश्न शेतकरी जागर मंचने उपस्थित केला आहे. 
 
मंचाचे पदाधिकारी विजय देशमुख यांनी या संदर्भात शुक्रवारी दुपारी थेट मुख्यमंत्री सचिवालयाशी (सीएमओ) संपर्क केला. या संपर्काला उत्तर मिळाले असून या उत्तरातूनच जिल्हाधिकारी आणि तुरुंगधिकाऱ्यांशी भेट घेण्याची गरज प्रतिपादित करण्यात आली अाहे. या अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर अशा शेतकऱ्यांची संख्या किती आहे आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र शिबीर घेणे शक्य आहे का, याची पडताळणी केली जाईल, असे सीएमओचे म्हणणे आहे.दरम्यान सीएमओच्या या उत्तरवर्ती व्यवहारानंतर विजय देशमुख यांच्यासह प्रशांत गावंडे, मनोज तायडे, जगदीश मुरुमकार, ज्ञानेश्वर सुलताने, सय्यद वासीफ आदींनी उद्या, शनिवारी जिल्हाधिकारी तुरुंगाधिकाऱ्यांना भेटण्याचे ठरवले आहे. या स्थितीत बंदीजन आणि आजाऱ्यांचा मुद्दा उचलल्याबद्दल जागर मंचाचे अभिनंदन केले जात आहे. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी िजल्ह्यात २६३ अधिकृत केंद्रे उघडण्यात आली आहेत. 
 
अर्ज १.२३ लाख, नोंदणी झाली २.३३ लाख 
दरम्यानआज, शुक्रवारपर्यंत लाख ३३ हजार १२५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी लाख २३ हजार २४६ जणांचे अर्ज पूर्णपणे भरण्यात आले आहे. कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकूण संख्या लाखाच्या आसपास आहे. २२ सप्टेंबरपर्यंत यापैकी किती जण अर्ज भरतात, हे येणारी वेळेच सांगणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...