आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामगाव: जिल्ह्यात आगीच्या घटना सुरूच, पिंप्राळा येथे गोठ्यांना आग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करताना पिंप्राळा ग्रामस्थ. - Divya Marathi
आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करताना पिंप्राळा ग्रामस्थ.
खामगाव - उन्ह्याळ्यात उन्हासोबत नागरिकांना आगीचे चटके सोसावे लागत आहे. गेल्या आठ दिवसाच्या काळात जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आग लागुन कोटी रुपयांचा माल जळुन खाक झाल्याची घटना घडली. आज २२ एप्रिल रोजी तालुक्यातील पिंप्राळा येथे गोठ्यांना आग लागून शेती साहित्यासह जनावरांचा चारा जळुन खाक झाला आहे. 
 
पिंप्राळा येथील गावाच्या बाजूला असलेल्या गोठ्यातील कुटाराला शनिवारी सकाळी आग लागली होती. वाऱ्यामुळे या आगीने रुद्र रुप धारण करुन परिसरातील गोठेही आगीच्या विळाख्यात घेतले. यामध्ये गणेश श्रीराम हिंगणे, आनंद बाबन चंडाळणे, देवमन उत्तम वाकोडे, महादेव लक्ष्मण काळणे, माणिकराव जगन्नाथ पेसोडे, पांडु भगवान वाकोडे, निवृत्ती भगवान वाकोडे यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरांचा चारा, कडबा, सोयाबीनचे कुटार, तुरीचे कुटार, जळून खाक झाले. तर गणेश हिंगणे यांचे मळणी यंत्र तसेच ट्रॅक्टरची चाके आगीच्या विळख्यात सापडली. आग लागल्याची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. नंतर खामगाव, शेगाव, बाळापूर, बुलडाणा येथील अग्निशमन विभाग पिंप्राळ्यात दाखल झाला होता. दुपारी वाजेपर्यंत आग आटोक्यात आली. राज्याचे कृषी मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर आ. अॅड. आकाशदादा फुंडकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे संबंधितांना निर्देश दिले. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी रुपाली दरेकर, तहसीलदार सुनिल पाटील, नायब तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, घटनास्थळी दाखल झाले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, आगीमध्ये कृषीसाहित्य जळून झाले खाक... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...