आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्येसाठी दिली सुपारी? एमअायडीसी परिसरात गाेळीबार प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एमअायडीसी परिसरात झालेल्या गाेळीबारप्रकरणी पाेलिसांनी बुधवारी दाेन संशयितांची चाैकशी केली. सुपारी देऊन हत्याकांड घडण्यात अाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पाेलिसांनी तपासाला प्रारंभ केला अाहे. संताेष घनश्याम शर्मा (वय ३२, रा. शिवणी) या मशीन अाॅपरेटरची या मंगळवारी हत्या करण्यात अाली हाेती.

संताेष शर्मा हे एमअायडीसी परिसरातील श्रीहरी दाल मिलमध्ये मशीन अाॅपरेटर म्हणून काम करीत हाेते. मंगळवारी रात्री अाठ वाजताची शिफ्ट संपल्यानंतर ते एमएच-३०-झेड-३२९४ या क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे निघाले हाेते. रुंगठा टायर वर्क्सजवळ त्यांच्यावर हल्लेखोरांनी गाेळीबार केला. डाेक्याला जबर दुखापत झाल्याने माेठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला.

कारंजाचेदाेघे संशायाच्या भाेवऱ्यात : सूत्रांनीिदलेल्या माहितीनुसार संताेष शर्मा यांना सुमारे दीड वर्षांपूर्वी काहींनी जीवे मारण्याची धमकी दिली हाेती. या संशयितांनी स्वत: हत्या केली किंवा त्यांची सुपारी दिली, असा संशय व्यक्त करण्यात येत अाहे.

कटरचून केली हत्या : संताेषशर्मा घरी केव्हा जातात, काेणत्या रस्त्याने जातात, याची इत्थंभूत माहिती हल्लेखाेरांनी संकलित केली हाेती. तसेच देशी कट्ट्याची व्यवस्थाही त्यांनी केली हाेती. पाेलिस संताेष शर्माच्या संपर्कात असलेल्यांकडूनही माहिती घेत अाहे.
बातम्या आणखी आहेत...