आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळीबार; पाेलिसांच्या हाती लागले धागेदोरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एमअायडीसी परिसरात झालेल्या गाेळीबार प्रकरणाचे धागेदाेरे पाेलिसांच्या हाती लागल्याची माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली. याप्रकरणी लवकरच पाेलिस अाराेपींपर्यंत पाेहाेचणार अाहेत. संताेष घनश्याम शर्मा (वय ३२, रा. शिवणी) या मशीन अाॅपरेटरची मंगळवारी हत्या करण्यात अाली हाेती.

संताेष शर्मा हे एमअायडीसी परिसरातील श्रीहरी दाल मिलमध्ये मशीन अाॅपरेटर म्हणून काम करत हाेते. मंगळवारी रात्री अाठ वाजताची शिफ्ट संपल्यानंतर ते एमएच-३०-झेड-३२९४ या क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे निघाले हाेते. रुंगठा टायर वर्क्सजवळ त्यांच्यावर हल्लेखाेरांनी गाेळीबार केला. डाेक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना बिग सिनेमाजवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. मात्र, प्रकृती बिघडल्याने त्यांना अायकाॅन हाॅस्पिटलमध्ये हलवण्यात अाले. मात्र, डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले हाेते. याप्रकरणी एमअायडीसी पाेलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला हाेता.

अाराेपी परप्रांतात?
एमअायडीसीतील गाेळीबार प्रकरणातील अाराेपी परप्रांतात असल्याची माहिती पाेलिस सूत्रांनी दिली. हत्याकांडाला अनैतिक संबंधांची किनार असून, पाेलिस सर्वच दृष्टिकाेनातून तपास करत अाहेत. पाेलिसांनी अनेक संशयितांची चाैकशी केली अाहे. त्यानंतर पाेलिसांनी तपासाची िदशाही निश्चित केली अाहे.
बातम्या आणखी आहेत...