आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार प्रकल्पांत १५ दलघमी गाळ, तीन हजार २०० हेक्टर सिंचन झाले कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्याच्या विकासात महत्वाचा वाटा उचलणाऱ्या जल प्रकल्पांपैकी काटेपूर्णा, वान, मोर्णा, निर्गुणा या चार प्रकल्पात १५ दशलक्ष घनमीटर गाळ साचला आहे. एक दशलक्ष घनमीटर पाण्यातून १५० ते २०० हेक्टर जमिन सिंचनाखाली येते. परिणामी प्रकल्पात साचलेला गाळ लक्षात घेता, जवळपास तीन हजार हेक्टर जमिनीवरील सिंचन कमी झाले आहे.
आता श्रीमतींची वाख्या बदलली आहे. कारण ज्या जिल्ह्यात जास्तीत जास्त सिंचन प्रकल्प त्या जिल्ह्यात बारमाही पीक नि‍घते. त्यामुळे असे जिल्हे सुजलाम सुफलाम होतात. अकोला जिल्ह्याचा विचार केल्यास अकोला जिल्ह्यात खारपाणपट्टा आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ पाच लाख ४३ हजार १०० हेक्टर असून शेतीलायक क्षेत्रफळ चार लाख ९६ हजार आहे. तर जुन २०१६ अखेर ६८ हजार ४५१ हेक्टर जमिन सिंचनाखाली आली आहे. तुर्तास निर्माण झालेली सिंचन क्षमतेची शेतीलायक क्षेत्राचा विचार करता सिंचनाची टक्केवारी १३ आहे. जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यामुळे आता मोठे प्रकल्प बांधणे अशक्य बाब ठरली आहे. त्यामुळेच खारपाणपट्ट्यातील पूर्णा नदीवर बॅरेज बांधण्यात येत आहेत. यासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च येतो. ज्यावेळी पावसाळ्यात पाण्याचा फ्लो सुरु असतो. त्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात प्रकल्पात गाळही येतो. ठरावीक जलसंचय निर्माण झाल्या शिवाय गेट उघडले जात नाही. त्यामुळे पाण्यासोबत आलेला गाळ हा प्रकल्पाच्या तळाशी साचतो. हा गाळ नेमका किती साचला? याचे सर्वेक्षण मध्यवर्ती संकल्पन चित्र संघटना नाशिकच्या वतीने उपग्रहाच्या माध्यमातून केले जाते. त्याच बरोबर गाळ मोजण्याचे सुत्र देखील अस्तित्वात आहे. अकोला पाटबंधारेे विभागाने आता पर्यंत चार प्रकल्पांचा गाळ मोजला आहे. जलप्रकल्पांचे वय साधारणपणे ६० ते १०० असते. जिल्ह्यात १९७० पासून जल प्रकल्प बांधण्यास प्रारंभ झाला. मोर्णा, काटेपूर्णा या प्रकल्पांनी ४५ शी पार केली आहे. तर उर्वरित प्रकल्पांना २० किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष झाली आहेत.

मध्यवर्ती संकल्पन चित्र संघटनेने डिसेंबर २०१३ ला काटेपूर्णा आणि मोर्णा प्रकल्पाचा सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणानुसार काटेपूर्णा प्रकल्पात ६.३२ दशलक्ष घनमीटर तर मोर्णा प्रकल्पात ५.०३१ दशलक्ष घनमिटर तसेच वान प्रकल्पात ३.०२ दशलक्ष घनमीटर गाळ साचला आहे. काटेपूर्णा, मोर्णा, निर्गुणा आणि वान या चार जलप्रकल्पांची एकुण जलसंचय क्षमता २३८.६१ दशलक्ष घनमीटर आहे. तर या चारही प्रकल्प मिळून १६ दशलक्ष घनमिटर गाळ साचला आहे. त्यामुळेच आता खऱ्या अर्थाने या चार प्रकल्पांची साठवण क्षमता २२२.६१ दशलक्ष घनमीटर झाली आहे. त्यामुळे जवळपास ३२०० हेक्टर सिंचन क्षेत्र घटले आहे.

वान मध्ये ०.२६७ टक्क्याने वाढ
वान प्रकल्पातील गाळाचे सर्वेक्षण २००१ ला केले होते. या प्रकल्पाची साईट आणि भौगोलिक क्षेत्र लक्षात घेऊन मध्यवर्ती संकल्पन चित्र संघटनेने या प्रकल्पात प्रती वर्ष ०.२६७ टक्क्याने गाळ साचेल, असेही स्पष्ट केले होते.

उर्वरित प्रकल्पातील गाळाचे मोजमाप नाही
जिल्ह्यातदोन मोठे, तीन मध्यम आणि २३ लघु प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांची तहान भागवली जाते तर हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली आणली जाते. चार प्रकल्प वगळता अन्य प्रकल्पांत किती गाळ साचला आहे. याचे सर्वेक्षण झालेले नाही. याचे सर्वेक्षण झालेले नाही. परंतू या प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात गाळ साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गाळ मोजण्याचे सर्वसाधारण सूत्र
प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रानुसार संबंधित प्रकल्पात एका वर्षाला किती गाळ साचला? यासाठी हेक्टर-मिटर प्रती १०० चौरस किलोमीटर (प्रती वर्ष) या सुत्रांचा वापर केला जातो. दरम्यान, जिल्ह्यात ३२०० हेक्टर सिंचन क्षेत्र घटले अाहे.

जिल्ह्यातील ३२०० हेक्टर सिंचन घटले
एक दशलक्ष घनमीटर पाण्यातून १५० ते २०० हेक्टर जमिन सिंचनाखाली येते. चारही प्रकल्पात एकुण १६ दशलक्ष घनमिटर गाळ साचला आहे. या अनुषंगाने चारही प्रकल्पातून एकुण ३२०० हेक्टर जमिनीवर सिंचनात घट झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...