आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नरेगा’ स्वतंत्र यंत्रणेसाठी आता न्यायालयीन लढा, स्वतंत्र निधी द्यावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नरेगाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र शासकीय यंत्रणा उभारण्यात यावी, या मागणीकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठांमध्ये याचिका दाखल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय म. रा. ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीच्या सभेत घेतला. ही सभा रविवारी जिल्हा परिषदेच्या शाहू सभागृहात झाली. अनेक ठिकाणी नरेगाच्या कामांमध्ये ग्रामसेवकांवर नाहक कारवाई झाल्याचे प्रकारही घडले अाहेत. याच प्रकारांना कंटाळून राज्यातील ३२ ग्रामसेवकांनी अात्महत्याही केल्याही केल्या अाहेत.
 
 नरेगाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, यासाठी ग्रामसेवक युनियनकडून शासनाकडे पाठपुरावाही केला. मात्र त्याला अपयश अाले. दरम्यान, रविवारी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीच्या सभेतही उपराेक्त परिस्थितीवर चर्चा केली. नरेगाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी, याकरिता न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय सभेत घेण्यात घेण्यात अाला. 
 
भारत स्वच्छता मिशनची अंमलबजावणी ही नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हाेणे अावश्यक अाहे. काही अनेक ठिकाणी या मीशनसाठी ग्रामसेवकांची नेमणूक करण्यात येते.
 
यापृष्ठभूमीवरही सभेत चर्चा झाली. चर्चेअंती या मिशनसाठी ग्रामसेवकांवर सक्ती करण्यात येऊ नये, मिशनसाठी स्वतंत्र निधी देण्यात यावा असेही निर्णय सभेत घेण्यात अाले. 
 
सभेला निवडक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती 
सभेला राज्यातील निवडक पदाधिकारी उपस्थित हाेते. यामध्ये राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, उपाध्यक्ष उल्हास माेकळकार, सरचिटणीस प्रशांत जामाेदे, कार्याध्यक्ष नंदकुमार वानखडे, मानद अध्यक्ष हनुमंत मुरूळकार यांच्यासह अकाेला जिल्हाध्यक्ष रवी काटे, महेंद्र बाेचरे, याेगेश कापकर, विनोद वसू, राजू गरकल यांचा समावेश हाेता. 
बातम्या आणखी आहेत...