आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गण गण गणात बोते’चा गजर, ठिकठिकाणी महाप्रसाद, हजारो दिंड्या संतनगरीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेगाव- शेगावनिवासी संत श्री गजानन महाराज यांचा १३९ वा प्रगटदिन सोहळा आज माघ वद्य सप्तमी शनिवार, १८ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. या प्रकटदिन महोत्सवाला हजार वारकरी दिंड्यासह लाखो भाविकांनी आज संतनगरीत हजेरी लावून गजाननाचे दर्शन घेतले. ठिकठिकाणी महाप्रसाद, कीर्तन, प्रवचन यामुळे संतनगरी ‘गण गण गणात बोते’च्या गजराने दुमदुमून गेली होती. 

श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने श्रींचे प्रकटदिनानिमित्त ११ फेब्रुवारी पासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या सर्व धार्मिक विधींच्या कार्यक्रमांची पुर्णाहूती आज करण्यात येवून दुपारी वा.श्रीं च्या पालखीची नगर परिक्रमा काढण्यात आली. दरम्यान आज मंदिर परिसरात गर्दी होईल हे लक्षात घेऊन भाविकांच्या सोयीसाठी वन वे करण्यात आला होता. 

त्यात दर्शन बारी श्री मुखदर्शन बारी, महाप्रसाद, श्रींचा पारायण मंडप, श्रींची गादी, पलंग तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. श्रींच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, मंदिर परिसर केळीचे खांबांनी सजविण्यात आला आहे. भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्या वतीने सर्वतोपरी सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. सेवाधारी वर्गाकडून नेमूण दिलेले सेवाकार्य पूर्ण केल्या जात होते. भक्तांच्या सोयीसाठी कार पार्किंगची व्यवस्था मुरारका हायस्कूल मैदान, महात्मा फुले हायस्कूल मैदान, जुने कॉटन मार्केट मैदान, भुस्कटी मळा आदि ठिकाणी करण्यात आली होती. 

चोख पोलीस बंदोबस्त
 प्रकटदिनमहोत्सवात कोठे काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यासाठी पीआय, ३४ पीएसआय, ३०० कर्मचारी यांच्यासह ३० कर्मचाऱ्यांचे विशेष पथक, दंगाकाबु पथक, बॉम्ब शोधक नाशक पथक, अग्निशमन दल इत्यादी आवश्यक बाबींची पुर्तता करण्यात आली होती. तर अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके उप विभागीय पोलिस अधिकारी रूपाली दरेकर हे संतनगरीत ठाण मांडून होते. मात्र उत्सव हा निर्विघ्न पार पडला असून लाखो भाविकांनी गजानन महाराज समाधी दर्शन महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. 

महाअारतीत घेतला भाविकांनी लाभ 
श्रीं च्या प्रगट दिनानिमित्त कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कीर्तनाची सांगता आज दुपारी झाली. तसेच प्रगटदिनानिमित्त आयोजित गणेश यागाची पूर्णाहूतीचा कार्यक्रमही पार पडला. त्यानंतर दुपारी झालेल्या मध्यान्हाच्या आरतीचाचा लाभ भाविकांनी घेतला. लाखो भाविक आज संतनगरीत दाखल झाले होते. 

भजनी दिंड्यांना साहित्याचे वाटप 
आजच्या प्रकट दिन सोहळयाला जवळपास हजार भजनी दिंड्या दाखल झाल्या होत्या. दाखल झालेल्या नवीन दिंड्यांना नियमाची पूर्तता केल्यानंतर १० टाळ, वीणा, मृदंग, हातोडी, सहा पताका, ज्ञानेश्वरी, एकनाथी, भागवत ग्रंथ, तुकाराम गाथा असे संत साहित्य श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने वाटप करण्यात आले. 
 
पुढील स्लाइडवर पाहा दिंडीचे फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...