आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस जोडणी वाढल्यामुळे टक्क्याने रॉकेल वापरात 8 घट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा -  गॅसजोडणी घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम रॉकेल विक्रीच्या कोटयावर होत असल्याने रॉकेलच्या कोट्यात टक्क्याने घट झाली आहे. त्याचा परिणाम अनेकांच्या अवैध रॉकेल विक्रीवर होत आहे. रॉकेल मिळण्यास पात्र असलेल्या शिधापत्रिकाधारकांची संख्या तीन लाख ६,०३६ इतकी असली तरी शिधापत्रिकाधारक आधार संलग्नित संख्या दोन लाख ९४ हजार ३५७ इतकी आहे. 
 
जिल्ह्याला पूर्वी रॉकेलचा कोटा हजार ११७ के.एल इतका होता. गॅस जोडणीची संख्या वाढल्यानंतर एक हजार ०३२ के.एल इतके रॉकेल जिल्ह्याला मिळायला लागले आहे. पूर्वी रॉकेलासाठी रांगा लागत होत्या. तर विक्रेते रॉकेल संपल्याचे सांगून काळ्या बाजारात रॉकेल विकत होते. ठराविक दिवशीच रॉकेल मिळत असल्यामुळे त्याची ओरड होत हाेती. आता गॅसचे प्रमाण वाढल्याने रॉकेलचे प्रमाण घटत चालले आहे. तरीही मिळणारा कोटा बघता रॉकेल आजही काळ्या बाजारात विकल्या जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रॉकेल मिळाल्यास ग्राहक कमी तर किरकोळ विक्रेत्यांची ओरड जास्त असते. गॅस असणाऱ्यांना रॉकेल मिळत नाही. जिल्ह्यात ४८ हजार २९८ शिधापत्रिका धारकांकडे दोन गॅस आहे. तर एक लाख ८० हजार ४२६ शिधापत्रिका धारकांकडे एक गॅस आहे. रॉकेल मिळण्यास पात्र शिधापत्रिका धारकांची एक व्यक्ती असलेली संख्या १८ हजार ९४०, दोन व्यक्ती असलेल्यांची संख्या ३४ हजार ७२८, तीन व्यक्ती असलेल्या शिधापत्रिका धारकांची संख्या दोन लाख ५२ हजार ३५७ इतकी आहे. 

आधार लिंकिंग करा 
^ज्याशिधापत्रिकाधारकांनी आपले रॉकेल शिधापत्रिका आधार लिंकिंग करुन घेतली नसेल त्यांनी आधार लिंकिंग करुन घेण्यात यावे. ज्यामुळे लाभ देण्यास सुकर काम होईल. बी.यू. काळे जिल्हा पुरवठा अधिकारी 

गॅस जोडणी संख्या 
तालुका जोडणी जोडणी 
बुलडाणा २२,१७० ८,९५६ 
चिखली १६,७०० ६,९८४ 
दे.राजा ६,५८२ १,६९५ 
मेहकर ११,६९२ ७४० 
लोणार १४,५१९ २,०४३ 
सिं.राजा १४,३५५ ५,९८५ 
मलकापूर २२,२०६ ५,२०२ 
मोताळा १५,४१५ २,७२२ 
नांदुरा १५,६५५ २,५०० 
खामगाव १६,३८९ ७,६३० 
शेगाव १०,०५२ १,९१० 
जळगाव ७,६३९ ८९९ 
संग्रामपूर ७,०५२ १,०३२ 

रॉकेल पात्र शिधापत्रिकाधारक 
बुलडाणा३१,४८२, चिखली ३४,६९०, देऊळगाव राजा १८,४१०, मेहकर ३४,४३५, लोणार १९,२२८, सिंदखेड राजा १८,९७८, मलकापूर १६,१३८, मोताळा १९,३५९, नांदुरा २१,०९१, खामगाव ३२,७४०, शेगाव १७,४००, जळगाव जामोद २३,०३८, संग्रामपूर १९,०३६. आधार कार्ड संलग्नित रॉकेल शिधापत्रिका धारक : बुलडाणा २७,९०७, चिखली २९,६५०, देऊळगाव राजा १८,२८१, मेहकर ३४,५१५, लोणार १८,८११, सिंदखेड राजा १८,६४०, मलकापूर १६,१३८, मोताळा १९,३५९, नांदुरा २०,९४७, खामगाव ३२,७४०, शेगाव १७,४००, जळगाव जामोद २२,५७०, संग्रामपूर १७,३८७. 
 
बातम्या आणखी आहेत...