आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: तोष्णीवाल हाऊसमधून सोने, हिऱ्यासह चांदीचे भांडे लंपास, मध्यरात्री घडली घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉकरवरील ठसे घेताना तज्ज्ञ - Divya Marathi
लॉकरवरील ठसे घेताना तज्ज्ञ
अकोला - तोष्णीवाल हाऊसमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १.५३ वाजता चोरट्यांनी खिडकीतून प्रवेश केला. घरातून चोरट्यांनी चांदीचे २० ताट, २० ग्लास २४ वाट्या, सोन्याचे दागिने हिरे लंपास केले. तोष्णीवाल यांच्याकडे काही दिवसांपूर्वी नोकरीला असलेल्या एका नोकराला संशयित म्हणून ताब्यात घेतले. तर श्वान पथक कृषी नगरच्या दिशेने गेल्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला आहे. 
 
मुर्तिजापूर रोडवरील बिग सिनेमाच्या समोर विनोदकुमार विष्णु तोष्णीवाल यांचा बंगला आहे. शुक्रवारी बंगल्यामध्ये दोनच महिला होत्या. रात्री चोरट्यांनी बंगल्याच्या आवार भिंतीवरून प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी हातोड्याने खिडकीचे गज काढले. खिडकीतून उडी मारून तिघे चोरटे घरात शिरले. त्यांनी घरातील कपाटातून लॉकरच्या चाव्या घेतल्या आणि लॉकर उघडले. चोरट्यांनी लॉकर मधून चांदीचे २० ताट, २० ग्लास २४ वाट्या तसेच सोने हिरे चोरट्यांनी चोरून नेले. घरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरट्याची चोरी कैद झाली आहे. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांना शनिवारी सकाळी विनोदकुमार तोष्णीवाल यांनी चोरीची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी पोलिस करीत असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनास्थळावर उपविभागीय अधिकारी उमेश माने पाटील, ठाणेदार अन्वर एम. शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांनी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. 

घटनास्थळावरून रुमाल केला जप्त : पोलिसांनीघटनास्थळावरून काळा रुमाल जप्त केला आहे. या रुमालावर नक्षीकाम झाल्याचे दिसून येते. या रुमालाच्या आधारे आणि खिडकीजवळ असलेल्या हातोड्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

अकोल्याचाडॉग आजारी, अमरावतीहून आले डॉगस्कॉड : अकोलायेथील श्वान आजारी आहे. त्यामुळे पोलिसांनी अमरावतीच्या डॉगस्कॉडला माहिती दिली. त्यानंतर दुपारी वाजताच्या सुमारास अमरावती येथील डॉगस्कॉड दाखल झाले होते. या डॉगस्कॉडने दिलेल्या संकेता वरून पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली आहे. 
 
तीन चोरट्यांनी डोक्यात घातलेली होती आर्मीकॅप 
२५ ते ३३ वयोगटातील तिघे युवक, त्यांच्या डोक्यात आर्मीकॅप असल्याचे पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले. पोलिसांनी त्यानुसार चोरट्याचा शोध सुरू केला आहे. तर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे वय हे ५० च्या जवळपास आहे. 

चोरटे पळाले कृषी नगरच्या दिशेने 
पोलिसांनी डॉगस्कॉडला पाचारण केले. या वेळी खिडकीच्या जवळ श्वानाला नेले असता. तेथून श्वानाने कृषी नगरच्या दिशेने पळ काढला. पोलिसही त्याच्या मागे धावत गेले असता तेथे धम्मकुटीच्या जवळ तो थांबला. याच दिशेने चोरटे पळून गेल्याचे पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा,  बंगल्यात प्रवेश करुन चोरी केली... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...