आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समित्यांवरील निवडीवरून कार्यकर्ते अाक्रमक; डावलल्याचा केला अाराेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्ह्यातील शासकीय समित्यांवरील नियुक्त्यांवरून शनिवारी झालेली भाजपची बैठक वादळी ठरली. पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डावलून विरोधी पक्ष कार्यकर्त्यांच्या नियुक्तीचा अाराेप बैठकीत केला. या निवड प्रक्रियेचा निषेध करुन ठराव मंजूर केला. तो मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्षांना पाठवणार अाहे. या बैठकीच्या निमित्ताने खासदार धाेत्रे, पालकमंत्री डाॅ. पाटील यांच्या गटातील दरी रुंदावण्याचे मत राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत अाहे. 
एकीकडे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पालकमंत्री निवडून अाले. दुसरीकडे खासदार धाेत्रेंच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने यश मिळवले. दाेन्ही गट कुरघोडीची संधी साेडत नाहीत. शनिवारी भाजपची ग्रामीण,महानगर कार्यकारीणीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी खा. धाेत्रे हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री डाॅ. पाटील, अामदार गोवर्धन शर्मा, जिल्हाध्यक्ष तेजराव थाेरात, अामदार प्रकाश भारसाकळे, अामदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, नारायण गव्हाणकर, महापाैर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, सभापती बाळ टाले, डाॅ. मालाेकार, श्रावण इंगळे, डाॅ. अशाेक अाेळंबे, सिद्धार्थ शर्मा, सुमन गावंडे, वसंत बाछुका, रमण जैन यांच्यासह तालुकाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित हाेते. पालकमंत्री डाॅ. पाटील, अामदार शर्मा यांनी शासनाच्या याेजना, लाेककल्याणाचे निर्णय जनतेपर्यंत पाेहाेचवण्याचे अावाहन केले. बैठकीचे सूत्रसंचालन कृष्ण माेरखडे यांनी केले. किशाेर बाेर्डे यांनी अाभार मानले. 

विरोधकांवर हल्लाबोल 
खासदार धाेत्रेंनी पक्षा अंतर्गत विरोधकांवर हल्लाबोल केला. त्यांनी पाटील यांच्याकडे पाहत विरोधकांचा समाचार घेतला. अापण खुर्चीवर बसण्यापूर्वी काेणावरही अन्याय हाेणार नाही, अशी शपथ घेतली हाेती. भाजपसाठी झटणारे पदाधिकारी कार्यकर्त्यांना संधी देणे अावश्यक हाेते, असे ते म्हणाले. ग्रामपंचायतसह भविष्यात हाेणाऱ्या निवडणुकीसाठी कंबर कसावी, असे अावाहन त्यांनी केले. 

हात उंचावून केला निषेध 
भारतीय जनता पक्षाशी संबंध नसलेल्या विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांची विविध समित्यांवर नियुक्ती केल्याचा अाराेप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याने बैठकीमध्ये खळबळ उडाली. कार्यकर्त्यांनी थेट हात उंचावून निवड प्रक्रियेचा विरोध करीत ठराव पारीत केला. हा ठराव महापाैर विजय अग्रवाल यांनी मांडला. त्याला खासदार संजय धाेत्रे यांनी अनुमोदन दिले. 
१. शेतकरी कर्जमाफी बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात अाला. 
२. प्रत्येक बुथवर ५० कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येणार अाहे. तसेच मतदार यादींमधील प्रत्येक पानाची जबाबदारी एका कार्यकर्त्यावर साेपवण्यात येणार अाहे. 
३. मराठा अारक्षणाला पाठिंबा िदल्याने अाणि अारक्षणाचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवल्याने राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात अाले. 
४. शेतकरी कर्जमाफी साठीचा अाॅनलाईन अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया सुरळीत हाेण्यासाठी पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. 
महानगरात शनिवारी झालेल्या भाजपच्या बैठकीत उपस्थित ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते. 

नियुक्तीत काेणालाच डावललेले नाही 
^समित्यांवर निवडीचा फाॅम्युला असताे. एकाच पक्ष कार्यकर्त्यांची निवड करुन चालत नाही. नियुक्तीत काेणालाच डावलले नाही. लोकशाहीत निवडीसाठी प्रक्रिया असते. राज्य सरकारला ही मित्र पक्षांचा पाठिंबा अाहे, हे विसरून चालत नाही. नियुक्तीेत सर्वांना सामावून घ्यावे लागते. युती सरकारमध्ये काम करताना परिपक्वता ठेवावी लागते. एखाद्या कार्य कर्त्याने माहित नसतानाही काही तरी बाेलणे, त्यावर नेत्याने भाष्य करणे, हे परिपक्वतेचे लक्षण नाही.’’ -डाॅ. रणजित पाटील, पालकमंत्री, अकाेला.
बातम्या आणखी आहेत...