आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरंजनकुमार गोयनका, रुंगटा यांची कारागृहात करण्यात आली रवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- भारतीयसेवा सदन शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष निरंजनकुमार गोयनका आणि सचिव जुगलकिशोर रुंगटा यांची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्यांना मंगळवारी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एस. एस. जांभळे यांचे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

२८ वर्षीय युवकावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप गोयनका आणि रुंगटा यांच्यावर आहे. ४० दिवसांपासून फरार असलेले गोयनका आणि रुंगटा हे सोमवारी सिव्हिल लाइन्स पोलिसांना शरण आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. मंगळवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केले.

न्यायालयाने बचावपक्ष आणि सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. निरंजनकुमार गोयनका आणि जुगलकिशोर रुंगटा या दोघांनी संगनमताने संस्थेत कायमस्वरूपी नोकरीचे आमिष देऊन २००७ पासून लैंिगक अत्याचार केले होते. मात्र, नोकरी दिली नाही, अशी तक्रार युवकाने पोलिसांत केल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर या प्रकरणात काय होते. याकडे लक्ष लागून होते. बुधवारी या दोन्ही आरोपींच्या वतीने न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

अंतरिमजामीन फेटाळला : कारागृहातीलमुक्काम टाळण्यासाठी आरोपीच्या वतीने लगेच न्यायालयात अंतरिम जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र तो अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे बुधवारी दाखल करण्यात येणाऱ्या नियमित जामीन अर्जावर काय निकाल येतो, याकडे लक्ष लागून आहे.
पोलिस कोठडीदरम्यान आरोपींची सखोल चौकशी
सोमवारआणि मंगळवार असे दोन दिवस आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते. यादरम्यान, पोलिसांनी आरोपींना घटनास्थळाविषयी आणि युवकावर कोठे कोठे अत्याचार केले याविषयी माहिती विचारली. या तपासाच्या आधारावर आता पोलिस न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहेत.
व्हिडिओचित्रफितीचा अहवाल बाकी
युवकाचेशोषणासंदर्भात स्वत: युवकानेच स्टिंग ऑपरेशन करून व्हिडिओ चित्रफीत बनवली होती. ती चित्रफीत युवकाने पोलिसांना दिली आहे. त्या चित्रफितीच्या सत्यतेबाबतची तपासणी करण्यासाठी सव्वा तासाची सीडी मुंबई येथील न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवली आहे. त्याचा अहवाल अजून येणे बाकी आहे.