आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारांपुढे पक्षांअंतर्गत राजकारणाचे अाव्हान, पदवीधर मतदारसंघ निवडणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अाता जिल्हयातील राजकीय हालचालींना वेग अाला असून, उमेदवारापुढे पक्षाअंतर्गत राजकारणाचे अाव्हान उभे ठाकले अाहे. तुर्तास तरी भाजप अािण काॅंग्रेसमध्ये लढत हाेणार असे चित्र असून या दाेन्ही उमेदवारांच्या पक्षात दाेन गट एकमेकांवर कुरघाेडी करण्याची एकही संधी साेडत नाहीत. त्यामुळे भाजप अािण काॅंग्रेसच्या उमेदवारांना एकीकडे विजयश्री खेचून अाणण्यासाठी घाम गाळावा लागणार असून, दुसरीकडे पक्षाअंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार अाहे. 
 
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा प्रथमच थेट राजकीय पक्षांनी उडी घेतली अाहे राज्यात प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री झाल्याने पक्षाने भविष्यात हाेणाऱ्या सर्वच निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी कंबर कसली अाहे. अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यापूर्वी थेट राजकीय पक्ष उडी घेत नव्हते. शिक्षक संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक विद्यार्थी संघटनांच्या पाठिंब्याने उमेदवार रिंगणात उतरत हाेते. अनेक उमेदवार तर चार-पाच वर्षे मतदाराला त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा पत्र पाठवूुन त्यांच्या संपर्कात अाहेत. यंदाच्या निवडणुकीत रिंगणात उतरण्यासाठी संभाव्य उमेदवार एक वर्षांपासून संपर्क अभियान राबवित अाहेत. 

काॅंग्रेससाठी अस्तित्वाचा प्रश्न : दाेनपेक्षा जास्त दशकापासून काॅंग्रेसला लाेकसभा, विधानसभा, विधान परिषद निवडणुकांमध्ये यश मिळालेले नाही. कधी अंतर्गत राजकारणाचा तर कधी साेशल इंजिनिअरींगचे गणित चुकल्याने काॅंग्रेसला पराभवाची सामना करावा लागला अाहे. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुका तर काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अािण भाजपने स्वतंत्र्य लढविल्या. या निवडणुकीत काॅंग्रेस -राष्ट्रवादी कांग्रेसचा तर सफायाच झाला. त्यामुळे पदवीधर मतदार संघाची निवडणूक ही काॅंग्रेससाठी अस्तित्वाची लढाईच राहणार अाहे. 

ज्येष्ठांना सांभाळण्याची कसरत : राष्ट्रवादीमधून काॅंग्रेसवासी झालेले अमरावती येथील संजय खाेडके यांना जिल्ह्यातील काॅंग्रेसमधील ज्येष्ठांना सांभण्याची कसरत करावी लागणार अाहे. काही दिवसांपूर्वी काॅंग्रेसमध्ये महानराध्यक्षनिवडीवरुन दाेन गट पडले हाेते. दुसऱ्या फळीतील नेत्यांनी निवडीच्या विराेधात थेट प्रदेशाध्यक्षांकडे धावही घेतली हाेती. मात्र नंतर प्रदेशाध्यक्षांनी निवड रद्द हाेणार नसल्याचे स्पष्ट केल्याने बंड फसले हाेते. 
 
बातम्या आणखी आहेत...