आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची कार्यकारिणी तयार; घाेषणा लवकरच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अागामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर शिवसेनेने पक्ष बांधणीवर भर दिला असून, जम्बाे कार्यकारीणी तयार केली अाहे. यासाठी रविवारी ग्रामीण विभागातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची गोपनीय बैठकही झाली. नियुक्ती हाेणाऱ्या पदाधिकाऱ्यांची यादीही तयार करण्यात अाल्याचे समजते. पक्ष नेतृत्वाच्या अादेशानंतर लवकरच कार्यकारीणीची घाेषणा हाेणार अाहे. 
 
निवडणुकांमध्ये भाजपकडून शतप्रतिशत भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनीही मोर्चे बांधणी सुरु केली आहे. त्यामुळे शिवसेनेनेही एकला चलाे रेची घाेषणा करीत पक्ष बांधणीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठक झाली. यामध्ये जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, निवासी उपजिल्हा प्रमुख गाेपाल दातकर, उपजिल्हा प्रमुख बंडू ढाेरे, मुकेश मुरुमकार, रवींद्र पाेरे, संजय गावंडे अादींना समावेश हाेता. 

अशी हाेणार नियुक्ती 
 
जि.प. पंचायत सर्कल प्रमुख, उपतालुका प्रमुखांची त्यानंतर प्रत्येक गावात शाखा स्थापन करुन बुथ प्रमुखांची नियुक्ती करण्यात येणार अाहे. जि.प.सर्कल प्रमुख :- ५२ 
पं. स. सर्कल प्रमुख:- १०४ 
उपतालुका प्रमुख :- २६ दाेन जि.प.सर्कलसाठी एक उपतालुका प्रमुखाची निवड करण्यात येईल. 

निवडणुकीसाठी भाजपनेही कसली कंबर 
जिल्ह्यातील२७५ ग्राम पंचायत निवडणुका होऊ घातल्या असून, या साठी जिल्हा भाजपा ग्रामीण कंबर कसली अाहे. जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात २५, अकोट - ३७, मूर्तिजापूर - ५१, अकोला - ५७, बाळापूर - २७, बार्शीटाकळी - ५०, पातूर-२८ ठिकाणी निवडणुका होऊ घातल्या आहेत. या दृष्टीने जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, रवी गावंडे, श्रीकृष्ण मोरखडे,नारायण भटकर, प्रेमानंद श्रीरामे, विलास पोटे, राजेश रावणकर, गजानन उंबरकर, अविनाश महल्ले, अनिल गावंडे, यांच्या नेतृत्वात पक्षाने कोर कमिटीची बैठक घेऊन गाव निहाय, आढावा घेण्यास भाजपने सुरुवात केली आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी पक्षबांधी करताना दिसत आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...