आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२८२ गावांमध्ये "नवा गडी नवा राज', १४१ महिला बनल्या ग्रामपंचायतीच्या कारभारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- जिल्ह्यातील२८२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची निवडणूक आज सप्टेंबर रोजी दुपारी शांततेत पार पडली. ग्राम पंचायतीवर आजपासून नवा गडी नवे राज्य प्रस्थापित झाले असून, १४१ महिला या गावच्या कारभारी बनल्या आहेत. गुलालाची उधळण, पुष्पांचे गुच्छ, गळयात फुलांचा हार घालुन् गावचे नवे कारभारी अाज ग्रामस्थांसमोर हात जोडुन चांगले कार्य करण्याचे आश्वासन दिले.
बुलडाणा तालुक्यातील २५ ग्राम पंचायत सरपंच पदाच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. यामध्ये कुंबेफळ सरपंच पदी सुनिता जगन्नाथ वाघ, उपसरपंच आनंदीबाई विजय बावस्कर, धाड सरपंच रिझवान सौदागर तर उपसरपंच दिलीप खांडवे, जांब सरपंच संजय किसन सोनुने तर उपसरपंच उषाबाई भीमराव ताठे, कोलवड सरपंच कौतिकराव पाटील तर उपसरपंच प्रल्हाद शेषराव पाटील, शिरपूर सरपंच स्वाती प्रदीप हिवाळे तर उपसरपंच शीतल दीपक सुसर, पळसखेड नाईक, नागो सरपंच अंजली अशोक राठोड, उपसरपंच सरला डिगांबर सावळे, वरुड सरपंच रमेश देवराव गोरे, उपसरपंच लक्ष्मी गजानन मधाडे, गुम्मी सरपंच कांताबाई रामधन नरोटे, उपसरपंच रुख्मिनाबाई कृष्णा नरोटे,चांडोळ सरपंच रामदास दशरथ शेळके, उपसरपंच राजेंद्र शिवसिंग चांदा, रुईखेड टेकाळ सरपंच अर्चना दीपक टेकाळे तर उपसरपंच शरद तेजराव एकडे, जनुना सरपंच अनिता दिलीप राजपूत, उपसरपंच पुष्पा बापुराव नरोटे, देवपूर सरपंच शारदा संदीप नरोटे, उपसरपंच विनोद सांडु सोळंके, केसापूर सरपंच चंद्रभागा निंबाजी पानपाटील, उपसरपंच अलका प्रकाश बिल्लारी, दहीद बु. सरपंच अनिता अनिस बरडे, उपसरपंच विलास साहेबराव राऊत, डोमरुळ सरपंच पुष्पा शामराव शिंब्रे, उपसरपंच एकनाथ संपत धंदर, दहीद खुर्द सरपंच सुरेखा कडूबा सावळे उपसरपंच छाया प्रकाश पानपाटील, डोंगरखंडाळा सरपंच मालती किशोर चांडक, उपसरपंच अरुण हिंमतराव सावळे, कुलमखेड सरपंच पार्वताबाई कृष्णा कानडजे, उपसरपंच माणिकराव गंगाराम कानडजे, दुधा सरपंच कावेरी सुधाकर सोनुने, उपसरपंच राजु गणपत जाधव, बोरखेड सरपंच अरुणा प्रवीण जाधव, उपसरपंच भिका ऊमाजी गायकवाड, बिरसिंगपूर सरपंच छाया संजय मुळे, उपसरपंच चारुशिला विजय कड, मासरुळ सरपंच ज्योती गजानन लांडे तर उपसरपंच सुरेश सुभाष अवचार, जामठी सरपंच शिला दिलीप तायडे, उपसरपंच शेख रिझवान शे सईद यांची निवड करण्यात आली.

धाड सरंपचपदी रिझवान सौदागर
बुलडाणा तालुक्यातील मोठी ग्राम पचायत असलेल्या धाड ग्राम पंचायतच्या सरंपच पदी रिझवान सौदागर तर उप सरपंच पदी दिलीप तोताराम खांडवे यांची बिन विराेध निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन जे. टी. पाटील, ग्राम विकास अधिकारी बी.एच.धंदर यांनी काम पाहिले. निवडणुक पार पडल्यानंतर गावातुन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे सभेत रुपांतर झाल्यानंतर सरपंच सौदागर यांनी गावातील सांडपाणी, रस्ते, आरोग्य विषयी समस्या प्राधान्यक्रमाने सोडविण्याचे आश्वासन दिले.

डोणगाव सरपंचपदी दुसऱ्यांदा अनुराधा धांडे
डोणगावसरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसेवा पॅनलच्या अनुराधा अरुण धांडे या निवडून आल्या. तर उपसरपंच सैय्यद नुर सैय्यद हबीब हे निवडून आले. या ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची झाली होती. माजी सरपंच संजय पाटील आखाडे यांनी जनसेवा ग्राम विकास पॅनलला जनतेने १७ पैकी उमेदवार निवडून देऊन बहुमत मिळवून दिले होते. संपूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या शिवसेनेला जागेवर समाधान मानावे लागले. तर सावजी यांचे पॅनलला जागा मिळाल्या होत्या. आज सरपंच पदाच्या निवडणुकीत अनुराधा लांडे यांना मते तर शिवसेनेचे उषा विनोद खोडके यांना मते मिळाली. उपसरपंचपदी सैय्यद नुर सैय्यद हबीब यांना तर शेषराव पळसकर यांना मते मिळाली सावजी यांच्या पॅनलया चांदनी शेख कासम बागवान यांनीसुध्दा अर्ज भरला होता. त्यांना मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.एम. झाल्टे , बी .आर. राऊत तसचे ग्राम विस्तार अधिकारी पंजाब मोरे यांनी काम पाहिले.

गोरेगाव सरपंचपदी सीमा पांचा यांची निवड
गोरेगावयेथील सरपंचपदी सीमा संजय पांचा यांची निवड झाली. उपसरपंचपदी रहीम खान पठाण यांची निवड झाली. हनवतखेड येथे तेलीआई ग्राम विकास पॅनलचे कावेरी सुरेश राठोड सरपंचपदी तर उपसरपंचपदी गजानन रामदास चव्हाण यांची निवड. हिवरा गडलिंग येथे राधिकाताई गोपाल मानतर यांची सरपंच तर उपसरपंचपदी अरुणा खरात यांची निवड करण्यात आली.

पांगरखेड तेली सरपंचपदी, उपसरपंच बिनविरोध
पांगरखेडतेली या ग्राम पंचायतच्या सरपंच पदी अंजलीताई सुर्वे यांची तर उप सरपंच पदी नितीन महादेव ठाकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक अधिकारी विजय सरोदे, ग्रामसेवक शेगोकार यांनी काम पाहिले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य गंगाताई नालिंदे, चंद्रभागाबाई नायगावकर, स्वाती शिंगणे, सुनिताताई राठोड, घनश्याम सूर्वे, संतोष राजबिंडे, संतोष शिरभैये, श्यामभाऊ सुर्वे, गोपाल पाखरे, महादेव ठाकरे यांची उपस्थिती होती.

साखरखेर्डा सरपंचपदी पूनमताई पाटील
साखरखेर्डायेथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंचपदाची निवडणूक आज शांततेत पार पडली. सरपंचपदी ग्राम विकास परिवर्तन पॅनलच्या पूनमताई महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसरपंच शिवसेनेसोबत एकनिष्ठ असलेले रफीक प्यारे यांचे नावावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, वेळेवर मो.असलम अंजुम यांना उपसरपंचपदाची संधी देण्यात आली. या निवडणुकीचे काम मंडळ अधिकारी गायकवाड, ग्राम सचिव मनोज मोरे तलाठी गुंजकर यांनी काम पाहिले.

बिबी येथे ग्राम विकास पॅनलचे सरपंच विजयी
राजकीयदृष्टयामहत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या बिबी येथील ग्राम पंचायतवर राष्ट्रवादीच्या ग्राम विकास पॅनलच्या छाया मुकेश बगडिया या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. त्यांनी अश्विनी रामेश्वर कायंदे यांचा आठ मतांनी पराभव केला. तर उपसरपंच पदी कुसुमताई शिवाजी मुळे यांची निवड झाली. त्यांनी विजय रामभाऊ अंभोरे यांचा पाच मतांनी पराभव केला. माजी समाजकल्याण सभापती अभय चव्हाण माजी पंचायत समिती सभापती राम भालेराव यांचेविरोधात माजी सरपंच दिलीप बनकर यांनी उभ्या केलेल्या पॅनलला मिळालेले हे यश आहे.

धाड येथे सरपंचपदाच्या निवडीनंतर अानंद साजरा करताना सरपंच उपसरपंच अन्य.
बुलडाणा तालुक्यातील २५, चिखली तालुक्यातील १, देऊळगाव राजा तालुक्यातील ०२, सिंदेखडराजा तालुक्यातील ४३, मेहकर तालुक्यातील ३८, लोणार तालुक्यातील १७, मलकापूर तालुक्यातील १९, मोताळा तालुक्यातील २७, नांदुरा तालुक्यातील २०, खामगाव तालुक्यातील ३२, शेगाव तालुक्यातील १४, जळगाव जामोद तालुक्यातील २४, संग्रामपुर तालुक्यातील २६ ग्राम पंचातीचे सरपंच उप सरपंच आज निवडण्यात आले.