आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५१ ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी, सागवन ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ५८ उमेदवार रिंगणात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- तालुक्यातील५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून, बुलडाणा शहराच्या सीमेलगतच्या सागवन या १७ सदस्यीय ग्रामपंचायतीसाठी ५८ उमेदवार रिंगणात आहेत. आपल्या बळावर निवडून येण्यासाठी प्रत्येकाने जोर लावण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीत पक्षांमध्ये लढतीचे चित्र नसून, पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांविरोधातच लढवण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र सागवन येथे आहे. त्यामुळे जोडण्याऐवजी पाडापाडीचे राजकारण होणार असल्याचे चिन्ह आहे.

बुलडाणा शहराचा भाग बनलेल्या सागवन सुंदरखेड या दोन ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायती मोठ्या असल्याने नगरपालिकेप्रमाणेच या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतात. जांभरुण हे गाव सागवन ग्रामपंचायतीमध्ये येते. धामणदरी या मोठ्या परिसराचाही समावेश ग्रामपंचायतीत आहे. या ग्रामपंचायतीचे मतदार साडेनऊ हजारांपर्यंत असून, सहा मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. शिवसेनेचे प्रभुत्व असलेल्या ग्रामपंचायतीवर पूर्वी काँग्रेसचे वर्चस्व होते. सध्या असलेल्या सरपंचांनी आपापले पॅनल उभे केले असून, काही ठिकाणी माजी सरपंचांनी आपापले पॅनल उभे केले आहे. बहुतांश ठिकाणी प्रभागात उभ्या राहिलेल्या उमेदवारांनी प्रभागासाठी आपले पॅनल बनवले आहे.

दुहेरी, तिहेरी लढत
काहीवॉर्डांमध्ये दोनच उमेदवार असल्याने सरळ लढत होत असून, काही वाॅर्डांमध्ये तिहेरी लढतीची शक्यता आहे. तीन माजी सरपंच लढतीत असल्याने निवडणुकीतील रंगत लक्षणीय राहणार आहे. चार ऑगस्ट रोजी मतदान होणार असून, मतमोजणी सहा ऑगस्ट रोजी होणार आहे.