आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाच्या सावटाखाली निवडणुकीला चढला ज्वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम- संपूर्णराज्यासह वाशीम जिल्हा सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे दुष्काळाच्या सावटाखाली सापडलेला आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक ऑगस्ट रोजी होणार असून, गावपुढारी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या संग्रामाचा ज्वर चढला आहे.

गेल्या ते वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती जिल्ह्यावर ओढवली आहे. शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पावसाअभावी यावर्षीचा खरीप हंगाम हातचा निघून जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसासाठी आराधना, उपासना आणि विविध प्रकारांव्दारे साकडे घातले जात आहे. दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावरचे हास्य गायबच झालेले आहे. बाजारपेठाही थंड पडल्या असून, आर्थिक उलाढालही संकटात सापडली आहे. एकंदरीत दुष्काळाच्या स्थितीमुळे सर्वच जण नैराश्येखाली दिवस घालवत आहे. असे असताना जिल्ह्यात १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली. येत्या ऑगस्टला मतदान होणार असून, प्रचार अंतिम चरणावर पोहोचला आहे. दुष्काळाची सर्वांधिक झळ शेतकरीवर्गाला पोहोचत असून, पाऊस आणि शेतीशिवाय त्यांना दुसरा कोणताच विचार सध्या सूचत नाही. ग्रामीण भागात ८० टक्के लोक शेती करतात. त्यामुळे गावाची निवडणूक म्हटली म्हणजे शेतकरी वर्गाला विचारात घेतल्याशिवाय पार पडणार नाही. मात्र शेतकऱ्यांची दुष्काळाने झालेली अवस्था कुणी ध्यानीमनी घेता गावागावात ग्रामपंचायत निवडणूक हा एकच विचार गावपुढारी स्थानिक नेतेमंडळी करित आहेत.

दुष्काळ शेतकऱ्यांवरच
गावोगावीनिवडणूक होत आहे. आपला उमेदवार पॅनेल विजयी होण्यासाठी सर्वच नेते कंबर कसून आहेत. दुष्काळी परिस्थिती असतानाही निवडणुकीचा ज्वर कमी झालेला नाही. निवडणुकीचे सर्व हातखंडे राबविले जात आहेत. त्यामुळे ग्रामिण भागात जनतेला निवडणुकीमुळे सुगीचे दिवस आल्यागत परिस्थिती दिसून येते. मात्र केवळ शेतीवरच विसंबून असलेला शेतकरी वर्ग यामध्ये लक्ष घालत नसल्याची स्थिती असल्याने दुष्काळाचे संकट केवळ त्यांच्यावरच उभे ठाकले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.