आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्याच्या दिव्यांग प्रमोद गुप्तांनी गुलाबी नगरीमध्ये उमटवले ‘माऊथ ऑर्गन’चे स्वर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अत्याधुनिक वाद्यांच्या गदारोळात माऊथ ऑर्गनसारखी वाद्ये कालबाह्य ठरत आहेत. परंतु त्याचे सौंदर्य श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यात प्रमोद गुप्ता यांच्यासारखे कलावंत तितकाच रस घेताना दिसतात. रात्रीच्या वेळी अमिताभ बच्चन शोलेमध्ये वाजवत असलेली माऊथ ऑर्गनवरील धून रसिक विसरु शकत नाहीत. तसाच आनंद रसिकांना देण्याचा गुप्ता यांचा प्रयत्न असतो. देशाच्या विविध भागामध्ये कला सादरीकरणाचा आनंद ते लुटतात. 

पोलिआे झाल्याने गुप्ता यांना अपंगत्व आले परंतु त्यामुळे त्यांच्या दिनचर्येत फरक पडला नाही. संगीत शिकणे, पोहणे, चारचाकी वाहन चालवण्यात त्यांनी महारथ मिळवली. माऊथ ऑर्गनवर त्यांची चांगली पकड आहे. जयपूर येथे ऑर्गनच्या संमेलनात त्यांनी कला सादर केली. उपस्थितांची वाहवा मिळवली. संमेलनात माऊथ ऑर्गन वाजवणाऱ्या तीनशे वादकांनी भाग घेतला. गुप्ता यांनी दिल मुझे बता दे तू किस पे गया है.. हे गीत सादर केले.यावेळी आनंद माथूर,विनोद गर्ग, रमण खंडेलवाल,घनशाम अग्रवाल, मनोज श्रीमाल यांनी आयोजन केले होते. गुप्ता यांचा संस्थेतर्फे गौरव केला. या वेळी येथील बिंद्रा उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...