आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात रोखण्यासाठी अाता हेडलाईट दिवसाही सुरुच, युरेापीय देशांच्या धर्तीवर निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- बाजारात दाखल झालेल्या दुचाकींचे हेडलाईट थेट इंजिनशी कनेक्ट आहेत. त्यामुळेच नवीन दुचाकींना लाईट सुरु-बंद करण्यासाठी बटन नाही. दुचाकी सुरु केल्यानंतर आता दिवस-रात्र हेडलाईट सुरुच राहत आहेत. रस्ता अपघातात दुचाकीधारकांच्या मृत्यूचे प्रमाणात प्रचंड वाढ झाल्याने युरेापीय देशांच्या धर्तीवर दिवसाही दुचाकींचे हेडलाइट सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपन्यांनी तशा दुचाकींचे उत्पादन सुरु केले आहे. 

मार्च २०१६ मध्ये हेडलाइट सुरुच ठेवण्याबाबत केंद्र सरकारने अधिसूचना जारी करून दुचाकींचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी एप्रिल २०१७ पासून ग्राहकांच्या हातात हेडलाईट सुरुच राहील अशा दुचाकी द्याव्यात असे आदेशित केले होते. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा एक समिती गठित करून अहवाल देण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार या समितनीने अहवाल सादर केला होता. त्यात म्हटले होते की, बहुतांश युरोपीय देशांमध्ये २०१३ पासून दुचाकींचे हेडलाईट इंजिनशी कनेक्ट आहेत. परिणामी वाहनांच्या अपघातात ४७ टक्यांनी घट झाली आहे. तर आपल्या देशात क्राईम रिपोर्टनुसार सकाळी संध्याकाळी वाहनांचे हेडलाईट सुरु असतात. त्यामुळे या दरम्यान वाहनांचे अपघात कमी आहेत. 

या सर्व बाबींचा अभ्यास करून अखेर अधिसुचना जारी करण्यात आली होती. त्यानुसार दुचाकींचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी तसे उत्पादन सुरु केले. अशा दुचाकी एप्रिल २०१७ उगवण्यापूर्वीच फेब्रुवारीमध्येच अकोल्यातील शोरूमध्ये दाखल झाल्या आहेत. 

अशा दुचाकी रस्त्यावरून धावत असल्याने लाईट बंद करण्यासाठी नागरिक प्रचलित सवयीनुसार दुचाकीधारकाला लाईट बंद करण्याचा हाताने इशारा करीत आहेत. मात्र लाईट बंदच होत नसल्याने दुचाकीधारकांना मनस्ताप तर नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

हेडलाईटसुरु असलेल्या कारही लवकरच येणार : हेडलाईटसुरु असलेल्या कारही बाजारात लवकरच येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. हेडलाईट सुरुच असलेली वाहने रस्त्यावर लवकरच पहायला मिळणार आहेत. 

काय होता समितीचा अहवाल
सर्वोच्चन्यायालयाने यासंदर्भात एक समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते. या समितीने युरोपीय देशात २०१३ पासून वाहनांच्या हेडलाइटचा स्वीच काढून टाकल्याने तेथे रस्ता अपघातात घट आली क्राईम रिपोर्टमध्ये सकाळ संध्याकाळी वाहनांने हेडलाइट सुरु असल्याने अपघातात घट झाल्याचे नमूद केले. देशातही दुचाकींचे हेडलाईट दिवसभर सुरुच राहिल्यास अपघातात घट होईल, असा तर्क काढून सदर निर्णय घेण्यात आला आहे. अाता नव्याने तयार करण्यात येणाऱ्या सर्व दुचाकींमध्ये कंपन्यांनी हेडलाइट स्वीच विरहित दुचाकींचे उत्पादन सुरु केले आहे. 

शहरात दिसतात अनेक दुचाकी 
दुचाकींचे हेडलाईट सुरु असलेली वाहनांचे प्रमाण सध्या कमी असले तरी दिवसेंदिवस अशा वाहनांची भर पडत आहे. एका दिवशी शहरातील शोरुममधून जवळपास ५० हेडलाइट सुरु असलेली दुचाकी वाहने बाहेर पडत आहेत. 

दिवसा समोरून वाहन येत असेल आणि आपणास ओव्हरटेक करायचे असेल तर हेडलाइटचा वाहनचालकाकडून वापर होतो. अशावेळी वाहनचालक हेडलाइट सुरु करतो. हा लाईट बघून समोरचे वाहन त्याचा वेग कमी करते. आता हेडलाइट सुरुच राहणार असल्याने ओव्हरटेक करताना अनेक दिवस वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...