आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू- मुस्लिम रिवाजाप्रमाणे पार पडला राजाराम बाबांचा अंत्यविधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोणगाव - मानवी जीवनातून मोक्ष मिळाल्यानंतर व्यक्तीवर त्या, त्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात येतात. परंतु एकाच व्यक्तीचा अंत्यविधी एकाचवेळी हिंदू मुस्लिम रीतीरिवाजाप्रमाणे पार पडल्याचा प्रसंग आजवर घडला नाही. मात्र येथून जवळच असलेल्या नागापूर येथे दोन्ही धर्माच्या परंपरेनुसार राजाराम बाजीराव धाबे उपाख्य आशिकबाबा यांचा अंत्यविधी पार पडला. 
मेहकर तालुक्यातील नागापूरचे रहिवासी राजाराम बाजीराव धाबे यांचा हिंदू धर्मात जन्म झाला. लहान वयातच त्यांनी इस्लाम धर्मात पिराने पीर दस्तगीर (गौसपाक)म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पिरांना गुरु मानले. सर्वधर्म समभावाचे आचरण करून आयुष्यभर त्याबाबतचा उपदेश भाविकांना दिला. त्यामुळे अनेकजण त्यांचे अनुयायी बनले. साई बाबा गौसपाक यांना ते मानत. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात गौसपाक भिकनशाह बाबा यांचा संदल काढला जातो. राजाराम बाबांची कीर्ती वाढत गेल्याने लोक त्यांना राजाराम बाबा उपाख्य आशिक बाबा या नावाने ओळखत होते. 

नागापूर याठिकाणी दरवर्षी ऊर्स साजरा करण्यात येत असतो. त्यानुसार यावर्षीही १५ फेब्रुवारीपासून ऊर्सचे आयोजन करण्यात आले होते. आणि याच दरम्यान, १३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता वयाच्या ६० व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी कसा करायचा असा प्रश्न त्यांच्या अनुयायांना पडला होता. मात्र जीवनभर ज्या माणसाने सर्वधर्म समभाव जपला, त्यांचा अंत्यविधी त्याचपद्धतीने करण्याचे अनुयायांनी ठरविले. आशिकबाबांची अंत्ययात्रा हिंदू रीतीरिवाजाने काढण्यात आली. तर समाधीस्थ दफनविधी मुस्लिम पद्धतीने करण्यात आला. या अंत्यसंस्कारप्रसंगी राम नाम जप दस्तगीर गौसपाक नामस्मरण करण्यात आले. 
 
ऊर्सच्या काळात झाले निधन 
नागापूर येथे दरवर्षी १५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत गौसपाक यांचा ऊर्स साजरा करण्यात येतो. अाणि आज १५ फेब्रुवारीला कव्वालीचा मुकाबला तर उद्या १६ तारखेला संदीपपाल महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होता. परंतु अशातच १३ तारखेला राजाराम उर्फ आशिकबाबांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भाविकामध्ये शोककळा पसरली आहे. 
 
ऊर्सच्या काळात झाले निधन 
नागापूरयेथे दरवर्षी १५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत गौसपाक यांचा ऊर्स साजरा करण्यात येतो. अाणि आज १५ फेब्रुवारीला कव्वालीचा मुकाबला तर उद्या १६ तारखेला संदीपपाल महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होता. परंतु अशातच १३ तारखेला राजाराम उर्फ आशिकबाबांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भाविकामध्ये शोककळा पसरली आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...