आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"हिंदू एकत्रीकरण'तर्फे मनुस्मृतीचे दहन, अकोला येथे मंचाने काढली रॅली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- येथील अखंड हिंदू धर्म एकत्रीकरण मंचच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी पार्क येथे मनुस्मृतीचे नुकतेच दहन केले. हा ग्रंथच हिंदूंचा धार्मिक ग्रंथ आहे, ही गैरसमजूत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी या वेळी नमूद केले. तत्पूर्वी संघटनेने रॅलीही काढली. या रॅलीचा समारोप मनुस्मृतीच्या दहनाने करण्यात आला.

मनुस्मृतीला सर्वच हिंदू प्रिय मानत नाही किंबहुना तो हिंदूंचा ग्रंथही होऊ शकत नाही, त्याद्वारे जाती-जातींमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. त्यामुळे जनजागरण करण्यासाठी िहंदू धर्म एकत्रीकरण मंच सात वर्षांपासून कार्यरत असून, हे कार्य अखंड चालवणार असल्याची घोषणा या वेळी करण्यात आली. शिवाजी पार्क येथे मनुस्मृतीचे दहन केल्यानंतर गणेश घाट येथे सभाही घेण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी अनुप खरारे होते. या सभेत अनंत राऊत यांनी ‘मानवता परमो धर्म’या विषयावर विचार व्यक्त केले. या वेळी मंचाचे पदाधिकारी उमेश लख्खन, राजेश भारती, सुरेश ठाकरे, मनोज पाटील, अनिल शुक्ला, मनोज सारवान, अमर डिकाव, सोनू वाटमार, सुनील मेश्राम, संग्राम गावंडे, संतोष मोहता, अनिल यादव, प्रवीण डांगरा, अशोक सोळंके, मोहन येवले, भारत सत्याल, वासुदेव आनंदानी, किशोर मानवटकर, रूपेश वानखडे, राजेश पटेल आदी उपस्थित होते.