आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्याने बायकोला धाकात ठेवण्यासाठी घेतला कट्टा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मलकापूरयेथील विजय प्रभाकर मानकर (वय ४१) याच्या घरातून खदान पोलिसांनी सोमवारी देशी कट्टा जप्त केला. विशेष म्हणजे त्याने बायकोला धाक दाखवण्यासाठी देशी कट्टा घेतला आहे.
विजय मानकर हा महावितरणमध्ये नोकरीला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचे पत्नीसोबत सातत्याने वाद हाेत आहेत. त्यामुळे त्याने पत्नीला धाक दाखवण्यासाठी देशी कट्टा विकत घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. गेल्या महिन्याच्या तारखेला त्याने त्याच्या पत्नीला धमकी दिली होती, की माझ्याशी जास्त वाद घातलास तर तुला जीवाने मारुन टाकेल. त्यासाठी माझ्याजवळ पिस्तूल आहे. तेव्हापासून मानकर यांच्या पत्नीने धास्ती घेतली होती. त्यांनीच खदान पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन शेळके यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी विजय मानकर याच्या फ्लॅटची झडती घेतली असता पोलिसांना देशी कट्टा चार राऊंड आढळून आले. पोलिसांनी विजय मानकर याला अटक केली आहे.

पत्नीला घाबरवत होता
-विजयमानकरयाने पत्नीला धमकावण्यासाठी देशी कट्टा आणला आहे. त्याने तो कुठून आणला याची माहिती घेणार आहोत. त्याच्याकडे शस्त्रपरवाना नसल्याचे त्याने सांगितले आहे.
गजानन शेळके, ठाणेदार खदान पोलिस ठाणे
बातम्या आणखी आहेत...