आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाेला : ‘ICU’मध्ये एसी, ना स्वच्छता; वाॅर्डात अाढळले फुटलेले इंजेक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वोपचार रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे निघालेले प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी. - Divya Marathi
सर्वोपचार रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे निघालेले प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी.
अकाेला - सर्वेापचार रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा बेताल कारभार शनिवारी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे केलेल्या पाहणीत उजेडात अाला. अतिदक्षता विभागात (अायसीयू) ना वातानुकुलीत यंत्रणा कार्यांन्वित हाेती, ना स्वच्छता गृह स्वच्छ हाेते. याच ठिकाणी वापरलेले (फुटलेले) इंजेक्शन उघड्यावर पडले हाेते. एकाच बेडवर दाेन रुग्णांवर उपचार करण्यात येत हाेते. अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरल्याने रुग्णांची प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडेल, अशी काहीशी स्थिती हाेती. त्यामुळे दाेन स्वच्छता निरीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवले असून, त्यांना स्पष्टीकरण देण्याचा अादेश अधिष्ठातांनी दिले. स्वच्छतेसह इतरही मागण्या पूर्ण झाल्यास अाठ दिवसानंतर स्वत: भरती हाेऊन अांदाेलन करण्यात येईल, असा इशारा प्रहारच्या नेत्यांनी प्रशासनाला दिला. सर्वेापचार रुग्णालयातील अस्वच्छता, बेताल कारभाराविरुद्ध शनिवारी सफाई अांदाेलन करणार असल्याची घोषणा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे केली हाेती. मात्र प्रहारने अांदाेलनाएेवजी पाहणी केली. दुपारी अामदार बच्चू कडू हे प्रथम अशाेक वाटिकेत आले. महापुरुषांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाल्यानंतर ते कार्यकर्त्यांसह सर्वेापचार रुग्णालयाकडे निघाले. कार्यकर्त्यांनी हातात झाडूही घेतले हाेते. त्यांनी प्रथम रुग्णालयातील अतिदक्षता विभाग सिकलसेल युनिटची पाहणी केली. 
 
मागणी केली निलंबनाची; पाठवले ‘सक्ती’च्या रजेवर 
अस्वच्छतेच्या मुद्यावरुन संबंधितांवर अाताच निलंबनाची कारवाई करा, अशी मागणी प्रहारच्या नेत्यांनी केली. यावर अधिष्ठातांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना अादेश तयार करण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनी प्रथम संबंधितांना नोटीस बजावण्याचा अादेश तयार केला. मात्र याला नेत्यांनी आक्षेप घेत निलंबनाची मागणी लावून धरली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दाेन स्वच्छता निरीक्षकांना सप्टेंबरपासून पाच दिवसाच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा अादेश तयार केला. या अादेशाची प्रत स्वच्छता निरीक्षक हेमंत इंगळे उमेश रामटेके यांना बजावण्यात अाली. 
 
येथे करण्यात आली पाहणी 
प्रहार संघटनेच्या नेत्यांनी सर्वोपचार रुग्णालयातील मेडिसीन वाॅर्ड, अपघात कक्ष, जळीत वाॅर्डाची पाहणी केली. त्या वेळी अपघात कक्षात वापरलेल्या साहित्याचे रिकामे खाेके अस्वच्छता पाहून अामदार बच्चू कडू यांनी परिचारिकांना जाब विचारला. याठिकाणी असलेल्या प्रत्येक स्वच्छतेसाठी परिचािरकेडून कडून ५०० रुपये जमा करा अािण मीही रक्कम देताे, असे ते म्हणाले. रिकाम्या खाेक्यांचा वापर रुग्णांच्या बेडजवळ केराची टाेपली म्हणून करण्यात असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. 
 
‘प्रहार’च्या मागण्या अन् प्रशासनाने दिली ग्वाही 
अामदार कडू यांनी अधिष्ठाता डाॅक्टरांनी विविध मागण्यांवर चर्चा केली. अपंगाचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात येईल, पात्र लाभार्थ्यांना जीवनदायी योजनेतून एमअारअाय खासगी ठिकाणाहून करुन देण्यात येईल, कर्मचारी उपलब्ध झाल्यास ६० खाटांची व्यवस्था करण्यात येईल, अायसीयुमध्ये वातानुकुलित यंत्रणा कार्यांन्वित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडे पाठपुरावा करु, नियमित स्वच्छतेकडे नियमित लक्ष देण्यात येईल, अशी ग्वाही महाविद्यालय प्रशासनातर्फे देण्यात अाली. 
बातम्या आणखी आहेत...