आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलापधकाव्दारे केली जाणार स्वच्छतेबाबत जनजागृती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माहिती देताना नगराध्यक्ष नाझेर काझी मुख्याधिकारी धनश्री शिंदे. - Divya Marathi
माहिती देताना नगराध्यक्ष नाझेर काझी मुख्याधिकारी धनश्री शिंदे.
सिंदखेड राजा - संतगाडगेबाबा स्वच्छता अभियाना अंतर्गत मातृतिर्थ सिंदखेड राजा नगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छ मातृतिर्थ सुंदर मातृतिर्थ’ या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून, त्या अंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये कलापथकाव्दारे जन जागृती करण्यात येणार असल्याचे माहिती नगराध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी दिली. आज १३ डिसेंबर रोजी नगर परिषद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी मुख्याधिकारी धनश्री शिंदे उपस्थित होत्या. या स्वच्छता पंधरवडा संदर्भांत जनजागृती व्हावी आणि एक आदर्श स्वच्छ सुदंर शहर निर्माण व्हावे. यासाठी हे अभियान राबविण्यात येत असून, त्या निमित्ताने सुप्रसिद्ध सिनेकलांवत कृप्णकांत जोशी यांचा बहारदार असा कलापथकाचा बहुरंगी बहुढंगी अश्या कार्यक्रमाव्दारे जनजागृती हाेणार आहे. १४ डिसंेबर ला त्रिगुणी पार, १५ डिसेंबर रोजी लहान राजवाडा, १६ डिसेंबर रोजी मोठा राजवाडा, १७ डिसेंबर रोजी जिजामाता नगर, १८ ला सावकारवाडा, १९ला धनगरवाडा येथे या पथकाद्वारे सायंकाळी ७.३० ते १० वाजेपर्यंत जनजागृती केली जाणार आहे. या पंधरवड्याचा समारोप २० डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमीत्त गावातुन सकाळी वाजता जिजामाता जन्मस्थान येथून भव्य रॅली काढुन हाेेणार आहे. तसेच जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सायंकाळी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे या वेळी काझी यानी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष देविदासभाउ ठाकरे, राजुआप्पा बोंद्रे, सिताराम चौधरी, महेशभाउ जाधव, उपाध्यक्षा सिमाताई शेवाळे, गंगाधर कुंडकर आदींची उपस्थिती होती.

स्वच्छतेचा मूलमंत्र यशस्वी करा
संत गाडगेबाबांनी स्वच्छतेला महत्व दिले. ठिकठिकाणी साचणारा कचरा गोळा केला. घराघरासमोरचा कचरा गावाबाहेर जाण्याकरता प्रबाेधन केले. ही स्वच्छता शहरवासियांनी पाळली तर सिंदखेड राजा ‘क्लिन’ होईल. तसेच ग्रीन सिंदखेडराजा करण्यासाठी वृक्ष संगोपन करण्याची अावश्यकता असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्ष काझी यांनी पत्रकारपरिषदेत बाेलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...