आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध सावकारांवर फौजदारी कारवाईच्या हालचाली सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला -  अवैध सावकारीच्या माध्यमातून खरेदी केलेल्या ३५.६४ हेक्टर अार. शेत जमिनीचे खरेदी-िवक्रीचे व्यवहार रद्द झाल्यानंतर अाता अवैध सावकरांवर फौजदारी कारवाईच्या हालचाली सुरु झाल्या अाहेत. याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने संबंधित तालुका उपनिबंधकांना शुक्रवारी अादेश दिले. 
 
सन २०१२ मध्ये १५ शेतकऱ्यांनी अवैध सावकारीबाबत उपनिबंधकांकडे तक्रारी केल्या. प्रथम तालुका उपनिबंधकांकडे सुनावणी झाली. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा उपनिबंधकांकडे वर्ग करण्यात अाले. जिल्हा उपनिबंधक गाेपाल मावळे सहकारी अधिकारी श्रेणी-२ राहुल अाेईंबे यांनी कसून चाैकशी केली. प्रत्यक्ष गावात जाऊन ग्रामस्थांकडूनही माहिती जाणून घेतली. चौकशीअंती शेतजमीन खरेदी-विक्री, गहाण-बाबत झालेले व्यवहार अवैध सावकारीच्या माध्यमातून झाल्याचे समाेर अाले. त्यामुळे ३५.६४ हेक्टर अार. शेत जमीनी तक्रारकर्त्या १५ शेतकऱ्यांच्या नावे हाेणार अाहे. काेट्यवधी रुपयांची जमीन केवळ १३ लाख ८० हजार रुपयांमध्ये घेण्यात अाली. 

‘त्या’ प्रकरणातील कारवाई थंड बस्त्यात 
सावकारी अधिनियमाची याेग्यपद्धतीने प्रभावीपणे अंमलबजावणी हाेण्यासाठी गठित करण्यात अालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या भरारी पथकाने मार्च राेजी वाशीम बाय पास परिसरात छापा टाकला हाेता. या छाप्यात काेरे धनादेश, पास बुक, साेने, चांदी राेख लाख ४० हजार रुपये जप्त करण्यात अाले हाेते. त्यानंतर याप्रकरणी जुने शहर पाेिलस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात अाला हाेता. मात्र नंतर हे प्रकरण थंड बस्त्यात पडले. त्यामुळे अाता या दाेन्ही प्रकरणी मालमत्ता जप्त करण्यासह इतरही कारवाई वेगाने करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून हाेत अाहे. 

१. अवैध सावकार प्रकरण प्रथम अकाेला तालुका उपनिबंधकांकडे हाेते. त्यांनी प्रथम भास्कार वाकाेडे यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जाची महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम -२०१४च्या कलम १६नुसार चाैकशी केली. त्यांनी अाॅगस्ट सप्टेंबर महिन्यात चाैकशी अहवाल तयार केला. शेतीची खरेदी विनापरवाना सावकारी व्यवहारातून करण्याचा अाली, असा ठपका त्यांनी ठेवला. मात्र नंतर त्यांना िजल्हाउपनिबंधक कार्यालयाकडून पेजिंग, इंडेक्सिंगकरिता परत पाठवण्यात अाले. त्यानंतर त्यांनी याच साखळीतील दुसऱ्या एका प्रकरणात शेतजमिनीचा व्यवहार हा अवैध सावकारीचा नसल्याचा अभिप्राय दिला हाेता. 

२. तालुका उपनिबंधकांना फेरचाैकशीचा कोणताही अादेश, सूचना करताना त्यांनी चाैकशी केली. गैरअर्जदारांनी काेणताही नवीन दस्तपुरावा नसतानाही चाैकशी करण्यात अाली. त्याबाबत राेजनामामध्ये नाेंद घेता सादरचा व्यवहार अवैध सावकारीतून नसल्याचा अभिप्राय दिला. 
३. तालुका उपनिबंधकांनी दाेन परस्पर भिन्न िवराेधी चाैकशीअहवाल िदल्याचे िनष्कर्षामध्ये नमूद करण्यात अाले अाहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी सखाेल चाैकशी करुन गैरअर्जदारांचा अाक्षेप खारीज केले. 

तालुका उपनिबंधकांच्या चाैकशीवर प्रश्नचिन्ह 
तूर खरेदीनंतर कारवाईस येणार अाता वेग 

सध्या जिल्ह्यात अकाेला, तेल्हारा, बार्शी-टाकळी, अाकाेट, मूर्तिजापूर येथे तूर खरेदी सुरु अाहे. दस्तावेजांची पडताळणी करुन टाेकन देण्याचे काम संबंधित तालुका उपनिबंधक कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी करीत अाहेत. लवकरच तूर खरेदी प्रक्रियेअंतर्गत टाेकण देण्याचे संपणार असून, त्यांनतर अवैध सावकारी प्रकरणी पुढील कारवाईसाठी उपनिबंधकांना वेळ मिळणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...