आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१४९ कोटींच्या वीज आराखड्यास स्वतंत्र मंजुरी, वीज आराखड्यास स्वतंत्र मंजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - लोकसहभागातून विद्युत विकास या ग्रामसभा अभियानाच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या १४९ कोटी ५१ लाख रूपयांच्या सर्वंकष कृती प्रकल्पास शासन पातळीवरून स्वतंत्ररीत्या मंजूरी प्रदान करण्यात येत असून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अशी घोषणा राज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज डिसेॆबर रोजी विधानसभेत केली. या बाबत आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता.
रूईखेड टेकाळे येथील रोहित्र हे ६३ के. व्ही. क्षमतेचे असून ते वीज वाहिन्या खांबासह तब्बल आठ महिन्यापासून नादुरूस्त अाहे.एवढेच नव्हे तर पाडळी, हतेडी अन्य ग्रामीण संपूर्ण मोताळा तालुक्यातील उप केंद्रातून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने अघोषित भार नियमनास शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. मोताळा तालुक्यातील सावरगांव उपकेंद्रावर नेहमीच क्षमतेपेक्षा अधिक भार येत असल्याने वीज पुरवठा वारंवार खंडीत
होतो. ग्रामीण भागातील वीज तंत्रीची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे वीज रोहित्र नादूरूस्त झाल्यास त्या परिसरातील शेतकऱ्यांनाच नादूरूस्त वीज रोहित्र स्वखर्चाने घेऊन जाणे,नविन रोहित्र स्वखर्चाने आणणे ते बसविण्यासाठी आवश्यक असलेले किरकोळ साहित्य विकत आणावे लागते. शेतकऱ्यांना बारा तास वीज देण्याच्या शासनाच्या घोषणेचा फज्जा उडाल्याचे आ. सपकाळ यांनी यावेळी सांगितले.
बुलडाणा विधान सभा मतदार संघात १०० ग्रामसभांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विद्युत विकास आराखड्यास सर्वंकष कृती आराखडा म्हणून स्वतंत्ररीत्या मंजुरी देण्यात येते. त्यांची अंमलबजावणीसाठी कालबध्द कृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. या आराखड्याची अंमलबजावणी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने त्याचा वेग मंदावल्याची कबुली देत ना. बावनकुळे यांनी जलद अंमलबजावणीसाठी निधी कालबध्द‍ कृती कार्यक्रम
निश्चित करण्याच्या दृष्टीने मंत्रालय स्तरावर महावितरण पारेषणची आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत बैठक त्वरित आयोजि‍त केल्या जाईल, असे सांगितले. तसेच वीज उपकरण वाहिन्यांचे नूतनीकरणाचे निर्देश देण्यात आले. रूईखेड टेकाळे परिसरातील नऊ रोहित्र, वीज वाहिन्या खांब चक्रीवादळात नादुरूस्त झाले होते. तेथे नवीन ४१ खांब उभे करून कृषि पंपांना विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी उच्चदाब उच्च वाहिनीच्या १२ गाळ्यांमधील लघुदाब वाहिनीच्या ८६ गाळ्यांमधील तुटलेल्या तारा जोडण्यात आल्या आहेत. रोहित्र आजमितीस पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहेत. येथील ६३ के.व्ही. च्या रोहित्रांची क्षमता वाढवून १०० के. व्ही. करण्यात आलेली आहे. तसेच दोन ६३ के.व्ही. चे अतिरिक्त रोहित्र खांब मंजूर करण्यात आले असून त्यांचे काम प्रगती पथावर असल्याचे उर्जामंत्री बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...