आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोरगावमंजू येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन, जलशिवारची बोरगावमंजूत सर्वाधिक कामे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू- स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कृषी विभागाच्या वतीने जिल्हाभरात जलपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत एसडीओ प्रा. संजय खडसे, सभापती गंगूबाई धामोळे, तहसीलदार संजय शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी आर. एस. निकम यांच्या उपस्थितीत जलपूजनाचा कार्यक्रम घेतला.
जिल्ह्यातील शेतकरी सुजलाम् सुफलाम् व्हावा याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ कोटींचा निधी जलशिवार अभियानांतर्गतच्या कामांसाठी उपलब्ध करून दिल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमप्रसंगी उपजिल्हाधिकारी प्रमोद दुबे, जिल्हा कृषी अधिकारी आर. एस. निकम, उपसंचालक शांताराम मालापुरे, मंडळ कृषी अधिकारी डी. एम. पवार, तसेच बी. एस. वानखडे, डी. एच. राखोंडे, जी. के. दलाल, अरुणा डोंगरे, आर. एस. वैतकार, बी. आर. बोळे, जलयुक्त शिवारचे बोरगावचे नोडल अधिकारी जी. वाय. परिहार यांच्यासह महसूलचे सुनील देशमुख, आर. एस. म्हैसने, ए. व्ही. चोपडे, गावातील नागरिक डॉ. राजेंद्र शर्मा, गोपाल दळवी शेतकरी उपस्थित होते.