आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला महापालिकेतील 4 जागांसाठी शेकडो जण इच्छुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गेल्या अनेक महिन्यापासून रखडेलली स्विकृत नगरसेवकांची नियुक्ती सप्टेंबरला होत आहे. या अनुषंगाने सर्व साधारण सभा बोलावण्यात आली असून स्विकृत नगरसेवकांची निवड होणार असल्याने इच्छुकही कामाला लागले आहेत. एकुण पाच स्विकृत नगरसेवक निवडले जाणार असले तरी सोमवारी चार स्विकृत नगरसेवक निवडले जातील. यात भाजपचे तीन तर कॉग्रेसचा एक राहिल. या दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड असल्याने स्विकृत नगरसेवकाची निवड ही दोन्ही पक्षाच्या श्रेष्ठींसाठी डोकेदुखी ठरली आहे. 
 
निवडणुकीच्या वेळी भाजपकडे इच्छुकांची संख्या शेकडो होती. या सर्वांना उमेदवारी देणे शक्य नव्हते. यापैकी काहींना पक्षश्रेष्ठीनी स्विकृत नगरसेवकाचे आश्वासन दिले होते. तर काहींना पक्षात जबाबदारी देण्याचे आश्वासन दिले होते. एकीकडे कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न तर आता दुसरीकडे पराभूत झालेले उमेदवारही स्विकृत साठी प्रयत्न करीत आहेत. भाजपमध्ये किशोर मांगटे पाटील, पवन पाडीया, विनोद बोर्डे, प्रकाश रेड्डी, धनंजय गिरधर, गिरीश गोखले, गिरीश जोशी, हरीभाऊ गाळे, निलेश निनोरे, सुनिल कोरडीया, धिरज ठाकूर, आरती लढ्ढा, चंदा ठाकूर, शितल रुपालेल, सोनल ठक्कर आदी शेकडो इच्छुक आहेत. आमदार, खासदार, राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानी इच्छुकांनी गर्दी केली आहे. तर दुसरीकडे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, महामंत्री डॉ.रामदास आंबटकर तसेच काहींनी थेट मुंबई गाठून फिल्डिंग लावण्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. त्यामुळे भाजपसाठी स्विकृत नगरसेवकाची नियुक्त डोकेदुखी ठरणार आहे. 
 
कॉग्रेसमध्येही झुंबड: एकीकडे भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे तर कॉग्रेस मध्येही हीच परिस्थिती पाहावयास मिळते आहे. कॉग्रेससाठी डोकेदुखी वाढण्याचे कारण की काॅग्रेसचा केवळ एकच सदस्य निवडला जाणार आहे. भरीस भर म्हणजे कॉग्रेसचे दिग्गज पराभूत झाल्याने हे सर्व दिग्गज स्विकृतसाठी प्रयत्न करीत आहेत. तर भाजप प्रमाणेच काहींना उमेदवारी नाकारल्याने त्यांना स्विकृतचे चॉकलेट देण्यात आले होते. त्यामुळे एकीकडे दिग्गज तर दुसरीकडे आश्वासन दिलेले कार्यकर्ते, अशी स्विकृतसाठी झुंबड उडाली आहे. तुर्तास इच्छुकांमध्ये माजी महापौर सुरेश पाटील, मदन भरगड, सुषमा निचळ, निखिलेश दिवेकर, राजेश भारती, प्रभजितसिंह बछेर, कपील रावदेव आदी इच्छुकांची रांग वाढती आहे. कॉग्रेसचे इच्छुकही प्रदेशाध्यक्ष, माजी प्रदेशाध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, माजी मंत्री आदी नेत्यांकडे आपापल्या परीने फिल्डिंग लावण्यात मग्न आहे. 
 
जागा इच्छुकांची संख्या ३५० 
भाजपच्या संख्याबळानुसार भाजचे स्विकृत सदस्य निवडले जाणार आहेत. जागा तर इच्छुकांची संख्या ३५० वर पोचली आहे. आपापल्या परीने इच्छुक जवळच्या नेत्याची मनधरणी करीत आहे. चार सप्टेंबरला सदस्यांची निवड होणार असल्याने पुढेच पाच दिवस इच्छुकांसाठी रात्र वैऱ्याची सारखेच आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...