आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कावड यात्रेने दुमदुमले अकोट; राष्ट्रभक्ती आणि सामाजिक जाणिवेची जोपासना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट- दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावणातील चौथ्या सोमवारी म्हणजे १४ ऑगस्ट रोजी अकोटमध्ये भव्य कावड यात्रा झाली. या वर्षी कावड यात्रेत भव्य मूर्ति सोबतच राष्ट्रभक्ती आणि सामाजिक जाणीवांची जोपासना करणारे फलक-देखावे सादर करण्यात आले. शोभायात्रेत २४ कावडधारक मंडळांनी सहभाग घेतला. 

या वर्षी कावड यात्रे मधे राम,लक्ष्मण,सीता,हनुमान,भगवान शंकर,महादेवाची पिंड,संत गजानन महाराज,अमरनाथ बाबा,यांच्या भव्य प्रतिमा भाविकांचे लक्ष वेधून घेत होत्या.त्या शिवाय अमर ज्योत जवान च्या देखावा,चिनी वस्तूंचा बहिष्कार करण्याचे आवाहन, बेटी पढाओ बेटी जगाओ,शेतकरी आत्महत्या टाळा,आदी संदेश देणारे देखावे आणि फलक लावून सामाजीक जागृती करण्यात आली. 

या शोभायात्रेत सामील झालेल्या शिवभक्तांसाठी विविध ठिकाणी पिण्याचे पाणी चहा फराळ फळांचे वाटप करण्यात आले. विविध सामाजिक संस्था आणि संघटना तर्फे या शिवभक्तांसाठी हे वाटप ठिकठिकाणी करण्यात आले. 

उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे आणि शहर पो.स्टे.ठाणेदार गजानन शेळके यांनी जातीने लक्ष घालून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. 

स्थानिक तपेश्वरी नंदीपेठमधील महादेवाला जलाभिषेक करण्याकरीता कावडधारी शिवभक्तांनी पूर्णानदीतून पाणी आणले होते. या कावड पालखी मिरवणुकीत २४ मंडळे सहभागी झाली होती. देशभक्तीसह विविध महादेवाची रूपे देखावे लक्षवेधी ठरली. या उत्सवामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण आहे. ठिकठिकाणी पालखीची पूजा करण्यात आली. यावेळी दर्शनाकरीता महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. कावड स्पर्धाचे परिक्षण महेश गणगणे यांचे निवासस्थान समोर करण्यात आले. 

भाविकांनी केले पालखीचे स्वागत
कावडयात्रेत मल्लखांबचे प्रात्यक्षिक, रस्त्यावर झालेला कचरा साफ करणे, भगवे झेंडे हातात घेऊन तरुणाई बॅन्ड च्या तालावर बेधुंद नाचत होती. ठिकठिकाणी पालखीचे भाविकांनी स्वागत केले. 

तपेश्वरी महादेवाला जलाभिषेक 
श्रावणातचौथ्या सोमवारी अकोट येथे कावड यात्रा निघते. गांधीग्राम येथील पूर्णा नदीतून शिवभक्त पायदळ वारीने कावड पाणी अकोटला आणतात. स्थानिक अकोला नाका येथून कावड यात्रा प्रारंभ होते. शहरातील प्रमुख मार्गावरून कावड यात्रेचे समापन तपेश्वरी महादेव मंदिरात होते. तेथे शिवभक्त जलाभिषेक करतात. 
बातम्या आणखी आहेत...