आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

५२ मुलींना फ्रॉक देऊन केले कुमारिका पूजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नवरात्रोत्सवात नवमीला कुमारीका पूजनाचे अतिशय महत्त्व आहे. बहुतांश घरी, नवरात्रोत्सव मंडळात परिसरातील कुमारिका मुलींना जेवण, भेटवस्तू देऊन पूजन केले जाते. मात्र यात आपण गरजू मुलींकडे दुर्लक्ष करतो. कोणत्याच घरी ज्या मुलींना गरज आहे, अशांना बोलवले जात नाही. अशाच गरजू, दुर्लक्षीत मुलींचे पूजन या नवरात्र करण्याचा विचार बक्षी आणि दुरगकर परिवाराने केला. दोन्ही परिवाराच्या वतीने महापालिका शाळा क्रमांक २६ मधील ५२ चिमुकल्या मुलींना फ्रॉक देऊन रविवारी कुमारिका पूजन केले.
जठारपेठ परिसरातील मायबोली कोचिंग क्लास येथे रविवार, ऑक्टोबर रोजी या आगळ्या वेगळ्या कुमारिका पूजनाचे आयोजन करण्यात आले. सीमा बक्षी, नितीन बक्षी, अभय दुरगकर, शिल्पा दुरगकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्यात प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे, वंदना नारे यांनी देखील सहभागी होऊन त्यांच्या वतीने या मुलींना भेटवस्तू आणि खाऊ दिले. शिवाय मुलींना मायबोली क्लासला येण्यासाठी शाळेची बस देखील पाठवली.
सहसा कोणी नवमी पूजनासाठी गरजू मुलींना बोलवत नाही. इतरांप्रमाणे त्या देखील कुमारिकाच आहे आणि खरे पाहता त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्यांना देऊन त्यांचे पूजन करणे अधिक महत्त्वाचे आहे. हाच विचार करून बक्षी आणि दुरगकर परिवाराने दुर्लक्षीत मुलींसोबत सण साजरा करण्याचा निर्णय घेतला. महापालिका शाळा क्रमांक २६ मधील इयत्ता चौथीतील सर्व चिमुकल्या मुलींना फ्रॉक घेण्याचा निर्णय झाला आणि तयारी सुरु झाली. शाळेत जाऊन प्रत्येक मुलीचे माप घेण्यापासून तर फ्रॉक शिवण्यापर्यंतचा प्रवास काही दिवसात पूर्ण झाला. रविवारी सकाळीच शाळेत प्रभात किड्स स्कूलच्या बसमधून मुली मायबोली क्लासला आल्या. अनेकींनी पहिल्यांदा हा परिसर पाहिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहलासोबतच नवा उत्साह पहायला मिळाला.

मायबोली क्लासला पोहचल्यानंतर त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. जेवण झाले आणि आता आम्हाला नवा फ्रॉक मिळणार या विचारानेच मुली भारावून गेल्या. एक एक मुलीचे नाव घेतल्या जात होते, तिचे पूजन, मग फ्रॉक आणि भेटवस्तू देण्यात येत होते. उर्वरितपान.
एवढेचनाही, तर मुलींनी लगेच नवे फ्रॉक घालून, आम्ही किती सुंदर दिसतोय, हे सांगितले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, डोळ्यातील ते भाव शब्दात व्यक्त करणे अवघड आहे.
रंगबेरंगी आकर्षक फ्रॉक घातलेल्या मुलींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अनेक मुलींनी मोठ्या ताईचा ड्रेस घालून आली, पण आता माझा स्वत:चा नवीन ड्रेस घालून चालली याचा आनंद झाल्याचे सांगितले. शिवाय नारे कुटूंबियांनी दिलेली भेट सुद्धा आवडल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांचा तो आनंद, उत्साह पाहून प्रत्येकाला गहिवरून आले आणि आपले कुमारिका पूजन सार्थक झाल्याचे समाधान वाटले. या उपक्रमात सीमा बक्षी, नितीन बक्षी, अभय दुरगकर, शिल्पा दुरगकर, डॉ. गजाननन नारे, वंदना नारे, प्रदीप बक्षी, श्वेता बक्षी, अपर्णा ढोरे, माधुरी जुनगडे, श्रीकांत जोगळेकर, अमिता चोपडे, दिव्या गावंडे, नेहा दही, कल्याणी जयस्वाल, रवीना मुंडे हे देखील सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...