आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिटवीत बिबट्याचा संशयास्पदरित्या मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टिटवी (ता. लोणार) परिसरात दोन वर्षीय नर बिबट्याचा मृतदेह सांडव्यातील पाण्यात संशयास्पद आढळला. - Divya Marathi
टिटवी (ता. लोणार) परिसरात दोन वर्षीय नर बिबट्याचा मृतदेह सांडव्यातील पाण्यात संशयास्पद आढळला.
लोणार - जानेफळ शिवारात एका बिबट्यासह रोहीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या घटनेची शाई वाळत नाही तोच, बुधवारी १९ जुलै रोजी तालुक्यातील टिटवी परिसरात एका दोन वर्षीय नर बिबट्याचा मृतदेह सांडव्यातील पाण्यात संशयास्पद स्थितीत आढळून अाला आहे. विशेष म्हणजे उन्हाळयाच्या दिवसात हाच बिबट्या एका कोरड्या विहिरीत पडला होता. त्यावेळी वन कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढून जीवदान दिले होते. परंतु अखेर त्याचा मृत्यू झाला आहे. सतत वन्य प्राण्याच्या मृत्यूच्या घटना घडत असल्यामुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. मळी नावाच्या शेत शिवारातील नाल्याच्या काठावर बिबट्या रोही या दोन वन्य प्राण्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले होतेे. या घटनेची शाई वाळत नाही तोच आज टिटवी परिसरात एक बिबट्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे.
 
दरम्यान काल या बिबट्याने एका शेतकऱ्याच्या कुत्र्याची शिकार केली होती. आज दुसऱ्याच दिवशी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. त्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्यामुळे या बिबट्याचा कोणीतरी खात्मा केल्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे ज्या सांडव्याच्या पाण्यात बिबट्याचा मृतदेह आढळून आला, दरम्यान या घटनेची माहिती पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर चिमडे यांनी वन विभागाला दिला. माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सदर बिबट्याचा मृतदेह सांडव्यातून बाहेर काढून पशु वैद्यकीय अधिकारी जाधव यांनी त्याचे शव विच्छेदन केले. या वेळी वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...