आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या दप्तरातून नेल्या जाताहेत दारूच्या बाटल्या, अकोला शहरात गोरक्षण रोडवरील चित्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील गोरक्षण रोडवर सध्या दारूची तीन दुकाने आहेत. या दुकानांवर दारू विकत घेण्यासाठी मोठी गर्दी असते. त्यातच लहान मुलांचा वापर दारू नेण्यासाठी केल्या जात अाहे.
 
विशेष म्हणजे १०-१२ वर्षाची मुले-मुली दप्तरात दारूच्या बाटल्या दिवसाढवळ्या घेऊन जाताना दिसून येत आहेत. याला आवर घालण्याऐवजी हे राजरोसपणे सुरू आहे. कोवळ्या मुलांच्या मनावर विपरित परिणामांची तमा प्रशासनाला नसल्याचे यातून अधोरेखित होत आहे. 
गोरक्षण रोडवरील इन्कम टॅक्स चौकात दारूच्या दुकानात ये-जा करणाऱ्यांचे निरिक्षण केले असता जे दिसून येते, ते धक्कादायक आहे. १०-१२ वर्षाच्या मुलांच्या दप्तरातून दारू नेण्याची गजब शक्कल अवैध दारू विक्रेत्यांनी लढवली आहे. मुलांना दुकानापासून काही अंतरावर मुले पाठीवर दप्तर घेऊन उभे राहतात. काही वेळाने त्यांचा अवैध धंद्यासाठी वापर करणारे दुकानातून दारू घेऊन येतात आणि या त्यांच्या दप्तरात दारूच्या बाटल्या टाकतात. त्यानंतर मुले ही दारू घेऊन जात आहेत. पोलिसांची आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी अशा प्रकारे दारूचा गोरखधंदा सुरू आहे. यावर उत्पादन शुल्क विभाग पोलिसांना कारवाईचे अधिकार असताना खुलेआम अवैध दारूची वाहतूक सुरु आहे. तर दुकानदारही विना परवाना एका ग्राहकाला मोठ्या संख्येने दारू देतात कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सायकल रिक्षामधून होते वाहतूक : दारूबंदीच्याकाळात अवैध दारू विक्रेते त्यावर कारवाई करणाऱ्या संबंधित यंत्रणेला सुगीचे दिवस आले आहेत. अनेकदा वाईन शॉपमधून दारू घेतल्यानंतर ते पोतळ्यात भरले जाते सायकल रिक्क्षामधून त्याची वाहतूक होते. 

दोन बंपर किंवा कॉर्टर नेण्याची मुभा 
- वाईन शॉपमधून दोन बंपर किंवा कॉर्टरपेक्षा अधिक दारू एका जणाला देता येत नाही. एका दिवसांसाठीचे परवाना देण्याचा अधिकार वाइनशॉप संचालकांना आहे. मात्र त्यापेक्षा अधिक दारू नेल्या जा असेल तर ते गैरकायदेशीर आहे.
राजेशकावळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अकोला. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...