आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् त्यांचे घरच बनले आता अनाथ मुलांचे आश्रयस्थान, जय बजरंग बालगृह संस्थेचे कार्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ज्यांनाआई-वडील आहेत, त्या मुलांचे लाड होतातच. त्यांना नातेबंध असलेल्या मायेच्या उबदार कुशीत सर्वच सुखसोयी उपलब्ध होतात. मात्र, ज्यांची परिस्थितीच त्यांचा अंत बघत असेल, अशांना खुल्या आभाळाखालीच जीवजंतूसारखी जागा शोधण्यावाचून पर्याय नसतो. परंतु, या सर्व गोष्टींची जाणीव ठेवणारे जिवंत समाजमनाचे सहृदयी माणसेही समाजात असतातच. म्हणतात ना, जो चोच देतो तो दाणाही देतो. त्या अनुषंगानेच टाकून दिलेल्या आणि पोटच्या मुलांनाही पोसू शकणार नाही अशी स्थिती असलेल्या मुलांचा सांभाळ अकोल्यापासून जवळच असलेल्या हिंगणा कुंभारी येथील जय बजरंग बालगृह संस्था २००४ पासून करत आहे.

विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिरकड यांनी अनाथ मुलांचे पालन पोषण करण्याचा विडा उचलला. ज्यांचे कुणीच नाही, अशा अनाथ मुलांचा आपण सांभाळ करायचा, त्यांना आईवडिलांचे सुख नाही देऊ शकू, पण तसा प्रयत्न तर करायचा, या हेतूने त्यांनी २००४ मध्ये हिंगणा कुंभारी येथे बालगृह सुरू केले. या बालगृहात पहिल्या वर्षी १५ अनाथ बालके दाखल झाली होती. त्यानंतर बालकांची संख्या वाढत गेली. आता या बालगृहात ५० मुले राहतील अशी व्यवस्था केली आहे. सध्या या बालगृहात ३२ बालके आहेत. त्यांना राहण्यासाठी तुकाराम बिरकड यांनी स्वत:चे निवासस्थान उपलब्ध केले आहे. कुणाला वडील नाहीत, कुणाला आई नाही, तर कुणाला दोघेही नाहीत, अशा मुलांसाठी बालगृह एक निवासस्थान बनले आहे.
...तर वाईट मार्गाने गेली असती
अनाथमुलांचा सांभाळ होणे फार गरजेचे आहे. या मुलांना निवारा दिला नसता, तर ही अशीच भटकली असती. त्यांच्यावर कुणाचेही लक्ष नसल्यामुळे त्यांना वाईट मार्गापासून कुणीही रोखले नसते.'' तुकारामबिरकड, अध्यक्षजय बजरंग बालगृह संस्था

मुलांना मायेची गरज : समाजातीलदानशूर व्यक्तींनी तथा सहृदयी व्यक्तींनी या बालगृहातील मुलांना मायेची उब देण्याची गरज आहे. शहरातून काही लोकं येतात का, आपणास कुणी खाऊ आणील काय, असे म्हणून या मुलांचे डोळे रस्त्याकडे असतात.