आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"महाबीज, कृषिधन'ला ग्राहक मंचाचा दणका, शेतकऱ्यांना तीन लाख ५६ हजार रुपये देण्याचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महाबीजआणि कृषिधन कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरले असता ते उगवल्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या विरोधात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने निकाल दिला आहे. निकालामध्ये कंपनीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी तीन लाख ५६ हजार रुपये देण्याचे आदेश दिले अाहेत. या निकालामुळे दोन्ही नामांकित कंपन्यांना मोठा झटका बसला आहे.
शेतात राब राब राबून शेतकरी हिरवे स्वप्न पाहत असतो. येणाऱ्या उत्पन्नावर त्याला मोठ्या आशा असतात. खरीप हंगाम त्याच्यासाठी वर्षभराची सोय करून देत असतो. मात्र, त्याने पेरलेले बियाणेच उगवले नाही तर त्याला मोठा हादरा बसतो. असाच प्रकार २०१४ च्या खरीप हंगामामध्ये अकोला तालुक्यातील दहीगाव गावंडे येथील शेतकऱ्यांच्या वाट्याला आला.
नयना नरेश काळे, शोभा सुरेश काळे, नरेश सुरेश काळे यांनी त्यांच्या पाच हेक्टर ५८ आर क्षेत्रावर महाबीज आणि कृषिधन कंपनीचे सोयाबीन बियाणे २७ जुलै २०१४ रोजी पेरले होते. मात्र, सात ते आठ दिवसांनंतर पेरलेल्या बियाण्यांपैकी ९० टक्के बियाणे उगवले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर कृषी अधिकारी आणि तज्ज्ञांनी शेतीचा सर्व्हे केला असता त्यांना १० टक्केच बियाणे उगवल्याचे दिसून आले.
याप्रकरणी शेतकऱ्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचात तक्रार दाखल केली होती. त्यावरून न्याय मंचात प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले होते. या वेळी महाबीज आणि कृषिधन या दोन्ही कंपन्यांना नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. सुरुवातीला कंपन्यांनी नुकसानभरपाईचा दावा अमान्य केला होता. मात्र, तज्ज्ञांचे परीक्षण आणि निरीक्षण ग्राह्य धरून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने कृषिधन सीड्सला आणि महाबीज कंपनीला तिन्ही शेतकऱ्यांना तीन लाख ५६ हजार रुपये नुकसानभरपाईपोटी देण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारकर्त्या शेतकऱ्यांकडून अॅड. दिनेश पोरे, अॅड. जयेश गावंडे यांनी काम पाहिले.

दीपक कृषी सेवा केंद्रातून खरेदी केले बियाणे
दहीगावगावंडे येथील शेतकऱ्यांनी ३० किलो वजनाच्या सोयाबीनचे ३३ हजार ३३९ रुपयांचे बियाणे अकोट स्टँड चौकातील दीपक कृषी सेवा केंद्रातून खरेदी केले होते. त्या शेतकऱ्यांनी दीपक कृषी सेवा केंद्रालाही पार्टी केले होते.

१० टक्केच बियाणे उगवले होते
शेतामध्येबियाणे कमी उगवले म्हणून तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने २० ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आपला अहवाल दिला होता. त्यानुसार सोयाबीन जेएस ३३५ या वाणाचे अनुक्रमे बियाणे सदोष आहे, असे मत दिले होते.