आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र बँकेत भरदिवसा चोरी; 5 लाख केले लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र बँकेत बुधवारी सकाळी चाेरी झाल्याचे लक्षात अाल्यानंतर पाेलिसांनी येऊन पंचनामा केला. - Divya Marathi
महाराष्ट्र बँकेत बुधवारी सकाळी चाेरी झाल्याचे लक्षात अाल्यानंतर पाेलिसांनी येऊन पंचनामा केला.
अकोला - शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी रोडवरील महाराष्ट्र बँकेत बुधवारी भरदिवसा चार चोरटे घुसले. त्यांनी कॅशीअर रुममधून पाच लाख रुपये चोरून नेले. संध्याकाळी हिशोब लावताना कॅश कमी दिसून आल्याने घटना उघडकीस आली. त्यानंतर हालचाली सुरु झाल्या. तोपर्यंत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. 
 
महाराष्ट्र बँकेत बुधवारी सकाळी ११ वाजता ग्राहकांची गर्दी वाढत असताना चोरट्यांनी प्रवेश केला. त्यांच्यातीत काहींनी काऊंटरवर असलेल्या अधिकाऱ्यांसोबत बँक व्यवहाराच्या संदर्भात विचारपूस सुरु केली. बँकेचे कर्मचारी या तोतयांशी ग्राहक समजून बोलत असताना त्यांच्याचपैकी एक जण मागच्या दिशेने कॅशिअर बसलेल्या कॅशिअर रुमच्या दिशेने गेला.कॅशिअर रुममधून नेमका कर्मचारी बाहेर निघाला उघड्या दारातून त्याने लगेच पाठमोरा होऊन तेथे ठेवेलेले ५०० रुपयांचे पाच लाख रुपयांचे बंडल उचलले बाहेर निघाला. त्याच्यापाठोपाठ त्याचे साथीदार बँकेतून बाहेर गेले. त्यानंतर दिवसभर बँकेचे व्यवहार सुरळीत सुरु होते. मात्र संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास कॅशिअर शिल्पा प्रभात ढोले यांना हिशोबात पाच लाख रुपये कमी असल्याचे दिसून आले. त्यांनी वारंवार पैसे मोजून बघितले मात्र पाच लाखांचा फरक दिसतच होता. ही बाब त्यांनी बँकेचे मॅनेजर अनिल जनार्दन गिसावडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांना संशय आल्याने त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात सकाळी ११.०२ वाजताच्या सुमारास एक ३० ते ३५ वर्षाचा युवक त्याच्या कॅशिअररुमकडे येताना दिसला त्याला इशारा करणारे चौघेजण दिसून आले. त्यानंतर बँकेचे मॅनेजर यांनी सिटी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार अनिल जुमळे, पोलिस उपनिरीक्षक अमित डहारे यांनी घटनास्थळ गाठून बँकेतील सीसीटीव्ही फुटेज बघितले असता त्यात चौघेजण दिसून आले. तत्काळ बँकेत उपविभागीय उमेश माने पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांनी सखोल चौकशी सुरु केली आहे आरोपीच्या शोधासाठी पथक गठित करून रवाना केले आहे. 
 
काऊंटरवरील सर्वांनाच एकसारखे बोलण्यात गुंतवले 
चोरट्यांनी नियोजनपूर्वक काम फत्ते केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून आले. बाकीचे चौघे-पाच जण काऊंटरवर असलेल्या सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांशी सारखेच बोलू लागले. यावेळी सर्वजण बोलत असताना एकाने कॅशीअरच्या दिशने कूच केले. तो जसजसा पुढे जात होता तसतसे त्याला त्यांच्यापैकीच एकजण खुणावत होता. 
 
सर्व बोलण्यात धुंद झाल्याचे दिसताच त्याने कॅशीअरच्या रूममध्ये ठेवेलेले ५०० रुपयांचे पाच लाखांचे बंडल उचलले बाहेर आला. तो बँकेच्या बाहेर गेल्यानंतर एक-एक जण बँकेतून बाहेर पडला. 
 
सर्व कामांना शिपाई एकच 
बँकेत शिपाई एकच आहे. तो कॅशिअरकडे असावा मात्र त्याला बँकेतील सर्वच जण कामे सांगत असल्याने सर्वांचे काम करतो कॅशिअरकडेसुद्धा येजा करीत असतो, यातूनच चोरट्यांनी रेकी करून त्यांचे काम फत्ते केले. पोलिसांनी सुद्धा बँकेच्या व्यवस्थापनावर खापर फोडले आहे. 
 
पुढील स्लाइवडवर वाचा, बँकेतील सुरक्षा व्यवस्था वेशीवर...
बातम्या आणखी आहेत...