आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरात मोटारसायकल रॅली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महात्मा फुले जयंतीनिमित्त शहरात निघाली मोटारसायकल रॅलीत सहभागी झालेले नागरिक. - Divya Marathi
महात्मा फुले जयंतीनिमित्त शहरात निघाली मोटारसायकल रॅलीत सहभागी झालेले नागरिक.
अकोला- महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने मंगळवार, ११ एप्रिल रोजी सायंकाळी हुतात्मा स्मारकापासून मोटारसायकल शोभायात्रा काढण्यात आली. महापौर विजय अग्रवाल यांनी शोभायात्रेला हिरवी झेंडी दाखवली. आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार बळीराम सिरस्कार, आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, सुधाकरराव गणगणे, हरिदास भदे, प्रा.तुकाराम बिरकड, प्रकाश तायडे, विलास दाते,माळी महासंघाचे सुभाष सातव यांच्यासह समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. 
 
म. फुले यांच्या वेशातील युवक, फेटेधारी महिला शोभायात्रेचे आकर्षण होत्या. युवकांसोबत महिलांचाही मोठ्या संख्येत सहभाग रॅलीमध्ये होता. हुतात्मा चौक, नेहरू पार्क, सिव्हिल लाईन चौक, रतनलाल प्लॉट चौक, दुर्गा चौक, लेडिहार्डिंग चौक, सावित्रीबाई फुले कन्या शाळा, संतोषीमाता मंदिर, अकोट स्टँड, मानेक टॉकिज, टिळक मार्ग, सिटी कोतवाली, गांधी मार्ग, बसस्थानक, टॉवर चौक मार्गे नवीन बसस्थानक आणि अशोकवाटिकेमध्ये शोभायात्रेची सांगता करण्यात आली. विविध संघटनांचा त्यात सहभाग होता. 
 
शिवतेज प्रतिष्ठान : येथील शिवतेज प्रतिष्ठानतर्फे म. जोतिबा फुले हनुमान जयंती साजरी केली. मंगळवार, ११ रोजी योग प्रशिक्षक मनोहर इंगळे यांच्या मार्गदर्शनात नेहरू पार्कमध्ये चालवण्यात येणाऱ्या योगवर्गात हनुमान जयंती साजरी केली. संजय चावडा, बी. जे. काळे, अनुराधा इंगळे यांनी हनुमंताच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर जोतिबा फुले यांचा जन्मदिवस साजरा केला. पुतळ्याचे पूजन केली. माजी प्राचार्य हाडोळे यांच्या हस्ते माल्यार्पण केले. बोबडे, आमले, रेवलनाथ जाधव, मुरलीधर गुंडे यांनी उपस्थितांना प्रसादाचे वितरण केले. कार्यक्रमासाठी बी. एस. देशमुख, जसवंतसिंग मल्ली, घनश्याम गांधी यांनी परिश्रम घेतले. 
 
फुले प्राथमिक मराठी शाळा: मोठ्या उमरीतील म. जोतिबा फुले प्राथमिक मराठी शाळेत म. फुले यांची जयंती साजरी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष डिगांबर मेहरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. पिंपळे, रमेश कलोरे, बेलसरेताई, घाटोळताई उपस्थित होत्या. संचालन प्रशांत घुगे यांनी तर आभार राजन लोखंडे यांनी मानले. मुख्याध्यापक होले, हिंगणे, लोखंडे, घुगे, काळे, गव्हाळे आदी उपस्थित होते. 
 
 
बातम्या आणखी आहेत...