आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाेला: महापाैर, उपमहापौरपदासाठी भाजपमध्ये चुरस; २६ नामनिर्देशन अर्ज वितरित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापाैर उपमहापाैरपदासाठीचे अर्ज घेताना. - Divya Marathi
महापाैर उपमहापाैरपदासाठीचे अर्ज घेताना.
अकाेला - महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी महापौरपदासाठी पक्षा-अंतर्गत चुरस वाढली अाहे. मात्र शुक्रवारी पक्ष निरीक्षकांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली अाहे. या चर्चेअंती महापाैर उपहापाैर पदासाठीची नावं निश्चित झाल्याचे समजते. दरम्यान विविध राजकीय पक्षांनी २६ नामनिर्देशन अर्ज घेतले. 
 
मनपाच्या २००२, २००७ २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती हाेती. गत अडीच वर्षांसाठी भाजप-शिवसेना युतीने सत्ता स्थापन केली. मात्र विधानसभा, नगराध्यक्ष, न.प. अािण त्यानंतर मनपा निवडणुकीत युती तुटली. भाजपचे ४८ नगरसेवक निवडून आले अाले. भाजपला निर्विवाद बहुमत मिळाल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग माेकळा झाला. 
 
दरम्यान, शुक्रवारी महापाैर उपमहापौर पदासाठी अर्ज वितरीत करण्यात अाले. फेब्रुवारी राेजी सकाळी ११ ते या वेळेत अर्ज स्वीकारण्यात येणार अाहेत. फेब्रुवारी राेजी छाननी एक पेक्षा जास्त उमेदवार असल्यास निवडणूक घेण्यात येईल, असे नगरसचिव अनिल बिडवे यांनी कळवले अाहे. 
 
भाजपकडूनयांनी घेतले अर्ज : महापाैरपदासाठीभाजपकडून विजय अग्रवाल, हरिष अालिमचंदानी, अरविंद उर्फ बाळ टाले, राहुल देशमुख, आशिष पवित्रकार सुनिता अग्रवाल अर्ज घेतले अाहेत. उपमहापौरपदासाठी वैशाली विलास शेळके, शारदा रणजित खेडकर, आशिष पवित्रकार यांनी अर्ज घेतले. 
 
पसंतीस्थायी समिती सभापतीसाठी? : भाजपलास्पष्ट बहुमत मिळाल्याने महापाैर, उपमहापौर स्थायी समितीचे सभापती या तीनही पदावर भाजप उमेदवारांचीच वर्णी लागणार अाहे. महापौरपदाच्या ‘विजया’चा मार्ग प्रशस्त झाल्यानंतरही पसंती मात्र स्थायी समिती सभापतीसाठी हाेती, असे सूत्रांचे म्हणणे अाहे. अखेर सर्वच स्थानिक नेत्यांनी ‘पांडुरंगाचा’ धावा केल्याने महापाैर पदासाठी ‘विजया’चा हाेकार मिळाल्याचे समजते. 
 
पालकमंत्र्यांचाही गट सक्रिय 
पदांसाठी पालकमंत्री डाॅ. पाटील यांचा गटही सक्रिय असल्याचे समजते. निवडणुकीची सूत्रे खासदार धाेत्रेंच्या गटाकडे हाेती. त्यामुळे पद निवडीत खा. धाेत्रे गट मुख्य भूमिका बजावणार अाहे. ‘पदवीधर’ निवडणुकीत विजयश्री खेचून अाणण्यासाठी हरिष अालिमचंदानी यांनी विक्रमी नाेंदणी केल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले हाेते. त्यामुळे पालकमंत्र्यांचे समर्थक म्हणून अाेळख असलेले अालिमचंदानी पवित्रकारांच्या गळात काेणत्या पदाची माळ पडते, हे लवकरच स्पष्ट हाेईल. 
 
सेना, काँग्रेस रिंगणात 
महापाैर, उपहापाैर निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस शिवसेनेनही उडी घेतली अाहे. महापाैरपदासाठी काॅंग्रेसकडून शेख नाैशाद यांनी अर्ज घेतला अाहे. उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून राजेश मिश्रा, गजानन चव्हाण अािण काॅंग्रेसकडून सुवर्णरेखा जाधव यांनी अर्ज घेतले अाहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...